Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

Rohit Sharma New Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून (IND vs ENG 2nd Test) विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला (Team India) आपली सर्वोत्तम कामगिरी करून हा सामना जिंकायचा आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विझाक कसोटीत उतरून इतिहास रचणार आहे. त्याला भारताचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) मागे सोडण्याची संधी आहे. होय, हा सामना जिंकून तो सर्वाधिक सामने जिंकणारा भारताचा तिसरा खेळाडू बनेल. (हे देखील वाचा: ICC U19 World Cup 2024: टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित, 'हे' संघ स्पर्धेतुन पडू शकतात बाहेर)

रोहित शर्मा रचू शकतो इतिहास 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 295 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, माजी कर्णधार एमएस धोनीने देखील समान संख्या म्हणजे 295 सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्माने हा सामना जिंकल्यास तो सर्वाधिक सामने जिंकणारा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. मात्र, या यादीत अव्वल क्रमांकावर विराट कोहलीचे नाव आहे, ज्याने 313 सामने जिंकले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरचे नाव आहे, ज्याने 307 सामने जिंकले आहेत. भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू

313 विजय- विराट कोहली

307 विजय- सचिन तेंडुलकर

295 विजय- रोहित शर्मा

295 विजय- एमएस धोनी

227 विजय- युवराज सिंग

विशाखापट्टणममधील भारताचा कसा आहे रेकाॅर्ड?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथील डॉ आरवाय राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आतापर्यंत भारतीय संघ या मैदानावर 2 सामने खेळला असून टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आहेत. पहिला सामना 2016 मध्ये झाला होता, जेव्हा भारत आणि इंग्लंड आमनेसामने होते आणि टीम इंडिया जिंकली होती. त्याच वेळी, 2019 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात दुसरी कसोटी झाली, जिथे टीम इंडियाने मोठा विजय मिळवला. म्हणजेच या मैदानावर टीम इंडियाची विजयाची टक्केवारी उत्कृष्ट आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.