Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

IND vs SL ODI: भारत आणि श्रीलंका (IND vs SL यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी ईडन गार्डन्सवर (Eden Gardens Kolkata) खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाला या सामन्यात मालिका जिंकायची आहे. पहिल्या सामन्यात भारताच्या विजयात विराट कोहलीचा (Virat Kohli) मोलाचा वाटा होता. या सामन्यात विराटने शानदार शतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फॉर्ममध्ये परतला आणि त्याने 83 धावांची खेळी खेळली. आता हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा ईडन गार्डनमध्ये धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. (हे देखील वाचा: IND vs SL 1st ODI: टीम इंडियाच्या पहिल्या वनडेत विजयानंतरही धोक्याची वाजली घंटा, 'या' 5 कारणांमुळे झाली डोकेदुखी)

रोहित आणि ईडन 5 वर्षांनंतर सज्ज

कोलकाता हे मैदान या दोन्ही खेळाडूंचे आवडते ठिकाण आहे. रोहितने या मैदानावर आपली सर्वोच्च धावसंख्या केली. 2017 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची खेळी केली होती. रोहितला पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना ईडन गार्डनसाठीही खास आहे. खरं तर, गेल्या पाच वर्षांपासून ईडन गार्डन्सवर एकही वनडे सामना खेळला गेला नाही.

या मैदानावर 21 सप्टेंबर 2017 रोजी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार होता. भारताने हा सामना 50 धावांनी जिंकला. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर एकदिवसीय सामना होत असल्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (सीएबी) अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांना विश्वास आहे की, स्टेडियम खचाखच भरले जाईल.

भारताने या मैदानावर आतापर्यंत एकूण 21 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 जिंकले आणि 8 हरले. या मैदानावर भारताने वनडेमध्ये सर्वाधिक 404 धावा केल्या आहेत. याच सामन्यात रोहितने द्विशतक झळकावले होते. एकूणच या मैदानावर भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. अशा स्थितीत श्रीलंकेचा संघ भारताला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.