पाकिस्तान बोर्डाशी सुरु असलेल्या विवादात Mohammad Amir कमबॅकसाठी सज्ज, आता या टीमकडून गाजवणार मैदान
मोहम्मद आमिर (Photo Credit: Twitter)

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) कॅरिबियन प्रीमियर लीगचा (Caribbean Premier League) आपला पहिला सत्र खेळण्यासाठी सज्ज आहे. सीपीएल (CPL) संघ बार्बाडोस ट्रायडंट्सने (Barbados Tridents) मंगळवारी आमिरला 2021 च्या मोसमासाठी संघात स्थान दिले आहे. सेंट किट्समध्ये (St Kitts) 28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर दरम्यान सीपीएलचे आयोजन केले जाणार आहे. डिसेंबर 2020 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला आमिर यापूर्वी सीपीएलमध्ये खेळलेला नाही आणि त्याने पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) 2021 मध्ये कराची किंग्जकडून मार्च महिन्यात अखेरचा व्यावसायिक क्रिकेट सामना खेळला होता. सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये आमिरचा रेकॉर्ड शानदार आहे. त्याने 190 टी-20 सामन्यांत फक्त 22.50 च्या सरासरीने 220 विकेट्स घेतल्या आहेत. (‘रोहित शर्मा-विराट कोहलीला सहज आऊट करु शकतो’, पाकिस्तानच्या माजी दिग्गज गोलंदाजांचे वादग्रस्त विधान)

पाकिस्तान क्रिकेट टीमचा स्टार वेगवान गोलंदाज आमिरचं गेल्या काही काळापासून टीम मॅनेजमेंटशी बिनसलं आहे. त्याने बोर्डावर 'मानसिक छळ' केल्याचा आरोप करून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, त्याने इंग्लंडचे नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया देखील सुरु केली असल्याचे वृत्त समोर आहे होते आणि आता या विवादादरम्यान त्याने सीपीएल स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. “बार्बाडोस ट्रायडंट्सने पाकिस्तानी डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरची सेवा मिळवली आहेत. त्याच्या नावावर 220 टी-20 विकेट्स असून, त्यापैकी 59 आंतरराष्ट्रीय सामन्यातील आहेत, आमिरकडे जगभरात मोठा अनुभव आणि यशाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे,” सीपीएलने आपल्या निवेदनात म्हटले.

शिवाय, सीपीएलमध्ये यंदा शोएब मलिक देखील झळकणार आहे. मलिकला गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्सने संघाचा केला समावेश आहे. 2019 मध्ये मलिकने या संघाकडून खेळला होता आणि गायनाने सलग 11 सामने जिंकले होते. याव्यतिरिक्त नेपाळ लेगस्पिनर संदीप लामिछाने यंदाच्या हंगामासाठी त्रिनबागो नाइट रायडर्स संघात सामील झाला आहे. सेंट किट्स कडून खेळल्यानंतर हा त्याचा चौथा सीपीएल संघ असेल. दरम्यान, यंदा या स्पर्धेचे महत्त्व अधिक असेल कारण यावर्षी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा देखील होणार आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना तयारी करण्याची संधी मिळेल.