IPL 2021 मधील उर्वरित सामन्यांबाबत BCCI अध्यक्ष सौरव गांगुली काय म्हणाले? घ्या जाणून
सौरव गांगुली (Photo Credits: Getty Images)

कोरोनामुळे (Coronavirus) आयपीएलचा चौदावा हंगाम (IPL 2021) 29 सामन्यानंतर स्थगित करावा लागला आहे. यामुळे या स्पर्धेचे उर्वरित सामने कधी आणि कुठे खेळले जातील? असा प्रश्न सर्व क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. यावर बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आयपीएलचे उर्वरित सामने यापुढे भारतात खेळवले जाणार नसल्याचे सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आयपीएलचे उर्वरित सामने कधी आणि कोणत्या देशात खेळवले जाणार? हे सांगणे थोडे कठीण आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सौरव गांगुली म्हणाले आहेत.

'स्पोर्ट्स स्टार'शी बोलताना सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांबाबत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, आयपीएलचे उर्वरित सामने भारतात खेळवले जाणार नाहीत. खेळाडूंसाठी 14 दिवस क्वारंटाईन राहणे आव्हानात्मक असते. त्यामुळे या उर्वरित सामन्यांचे आयोजन कधी आणि कुठल्या देशात केले जाणार, हे सांगणे जरा कठीण आहे” असेही गांगुलीने स्पष्ट केले आहे. हे देखील वाचा- Chetan Sakariya's Father Passes Away: चेतन सकारियाला 5 महिन्यात दुसरा मोठा धक्का, भावाच्या मृत्युनंतर वडिलांचे कोरोनामुळे निधन

ट्वीट-

विशेष म्हणजे, अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल 2021 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या चार काऊन्टी संघानेही इंग्लंड क्रिकेट बोर्डाला एक पत्र लिहून आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर मागील वर्षीप्रमाणे या वेळीही श्रीलंकेने आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्याची ऑफर दिली आहे. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन म्हणाले होते की, आयपीएलचे उर्वरित सामने भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये खेळले जावेत.