RCB vs RR IPL 2021 Match 16: बेंगलोरचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय, असे आहेत दोंघांचे प्लेइंग XI
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: File Image)

RCB vs RR IPL 2021 Match 16: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आज इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 16वा सामना रंगणार आहे. आरसीबी आणि राजस्थान संघातील आजचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळण्यात येणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघात प्रत्येकी एक महत्वपूर्ण बदल झाले आहेत. आजच्या लढतीत राजस्थान रॉयल्सपुढे सलग तीन सामने जिंकणाऱ्या बेंगलोर संघाचा विजयरथ रोखण्याचे कठीण आव्हान असेल. एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, काईल जेमीसन आणि हर्षल पटेलमुळे आरसीबी (RCB) संघ सध्या सर्वात घातक ठरत आहे तर राजस्थान संघ मधल्या फळीत संघर्ष करत आहे. (IPL 2021: राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूमध्ये दिसली बुमराह, अश्विन आणि हरभजनची झलक, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल खुश)

वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या आजच्या सामन्यासाठी आरसीबीने एकीकडे रजत पाटीदारला बाहेर करत केन रिचर्डसनचा समावेश केला आहे तर राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये जयदेव उनाडकटच्या जागी फिरकीपटू श्रेयस गोपालला संधी दिली आहे. दरम्यान, यापूर्वी दोन्ही संघ 23 वेळा आमनेसामने भिडले असून आकडेवारीनुसार दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोघांनी प्रत्येकी 10 सामने जिंकले असून 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. शिवाय, यंदाच्या मोसमात आरसीबी आणि राजस्थानने प्रत्येकी 3 सामने खेळले आहे. यामध्ये बेंगलोर संघाने सर्व सामने जिंकून पहिल्यांदा विजयाची हॅटट्रिक लगावली तर दुसरीकडे, राजस्थानला 1 सामन्यात विजय तर उर्वरित 2 मध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पडिक्क्ल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनियल ख्रिश्चन, वॉशिंग्टन सुंदर, केन रिचर्डसन, शाहबाझ अहमद, काईल जेमीसन, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), जोस बटलर, मनन वोहरा, शिवम दुबे, डेविड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, चेतन सकारिया आणि मुस्तफिझूर रहमान.