श्रेयस गोपालची बॉलिंग अक्शन (Photo Credit: Twitter)

RCB vs RR 16th IPL Match 2021: आयपीएलमध्ये (IPL) पहिल्यांदा संघाचे नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) सुरुवात काहीशी चांगली झाली नाही. आपल्या सलामीच्या सामन्यात जिथे संघाला अवघ्या 4 धावांनी पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यांनतर दिल्ली कॅपिटल्स विरोधात त्यांनी शानदार विजय मिळवला पण पुन्हा तिसऱ्या सामन्यात त्यांचा पराभवाला सामोरे जावे लागले. आता चौथ्या सामन्यात त्यांची टक्कर सलग तीन सामने जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी (Royal Challengers Bangalore) होणार आहे. दोन्ही संघांमधील सामना सायंकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांचा फिरकीपटू श्रेयस गोपाल (Shreyas Gopal) तीन वेगवेगळ्या गोलंदाजांची नक्कल करत आहे. गोपाल नेट्समध्ये जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि हरभजन सिंगच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसत आहे. (IPL 2021: यंदाचे वर्ष ठरेल RCB संघासाठी लकी! Michael Vaughan ने म्हटले- ‘विराटसेने’ला दूर करावा लागेल हा मोठा अडथळा)

गोपालची ही गोलंदाजी पाहून बेंगलोरला आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स नक्कीच कठीण आव्हान देतील असे दिसत आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओच्या शेवटमध्ये “मी हा व्हिडीओ बुमराहला दाखवला होता आणि मी त्याच्यापेक्षा चांगले करतो असं म्हणाला”, राहुलने म्हटले. दरम्यान, श्रेयस गोपालच्या या बॉलिंगला राजस्थान रॉयल्सने नाव देखील दिले आहे. संघाने बुमराहच्या गोलंदाजी शैलीला जसप्रीत गोपाल लिहिले आहे, तर अश्विनच्या बॉलिंग अक्शनवर रविचंद्रन गोपाल आणि हरभजन गोपाल असे नाव दिले आहे.

दुसरीकडे, दोन्ही संघामध्ये होणाऱ्या आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर यंदाच्या आयपीएल हंगामात आरसीबीने चमकदार कामगिरी करत आत्तापर्यंत सर्व तीन सामन्यात विजय मिळवला आहेत तर राजस्थानला एकच सामना जिंकता आलेला. त्यामुळे आजच्या सामना दोन ‘रॉयल’ संघात होणार असून राजस्थानपुढे बेंगलोरचा विजयीरथ रोखण्याचे कठीण आव्हान असणार आहे. शिवाय, आरसीबीला पराभूत करून विजयी मार्गावर परतण्याचे देखील त्यांचे ध्येय असेल. एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल सध्या सर्वोत्तम लयीत असल्यामुळे आरसीबी संघ सध्या घातक ठरत आहे तर कर्णधार सॅमसन, जोस बटलर आणि मनन वोहरा या आघाडीच्या तीन फलंदाजांवर राजस्थानची प्रामुख्याने भिस्त आहे.