RCB vs RR, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा हल्लाबोल! महिपाल रोमरोर याची झुंज, RCB समोर 155 धावांचे लक्ष्य
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या 15व्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो की फलंदाजांनी चुकीचा ठरवला. पहिले फलंदाजी करून राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 154 धावा केल्या आणि विराट कोहलीच्या आरसीबीसमोर (RCB) 155 धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थानकडून आज पुन्हा आघाडीची फळी अपयशी ठरली. कर्णधार स्मिथ 5, जोस बटलर 22 आणि संजू सॅमसन 4 धावा करून माघारी परतले. टीमकडून महिपाल लोमरोरने (Mahipal Lomror) सार्वधिक 47 धावा केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतिया (Rahul Tewatia) 24 आणि जोफ्रा आर्चर 16 धावा करून नाबाद परतले. रियान परागने त्याला चांगली साथ दिली. रियानने 16 धावा केल्या. दुसरीकडे, युजवेंद्र चहल 3, ईसूरु उदाना 2, तर नवदीप सैनीला 1 विकेट मिळाली. (RCB vs RR, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

राजस्थानकडून स्मिथ आणि बटलरने चांगली सुरुवात केली आणि 2 ओव्हरमध्ये 27 धावा केल्या. या दरम्यान, उदानाने स्मिथला स्वस्तात बोल्ड करून राजस्थानला मोठा धक्का दिला. या नंतर टीम सातत्याने विकेट गमावत राहिली. स्मिथ पाठोपाठ बटलर देखील 31च्या धावसंख्येवर माघारी परतला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सॅमसन स्वस्तात माघारी परतला. रॉबिन उथप्पा सावध खेळ करत होता, पण अखेर तो 17 धावा करून बाद झाला. यंदा आपला पहिला आयपीएल सामना खेळणारा लोमरोर एकटा झुंज देत राहिला. त्यानंतर रियान आणि लोमरोरमध्ये 35 धावांची भागीदारी झाली आणि टीमला शंभरी पार करून दिली. पण मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात रियान माघारी परतला. लोमरोर देखील षटकार मारण्याच्या प्रयत्नात आरोन फिंचकडे कॅच आऊट झाला.

यापूर्वी आजच्या आयपीएलच्या पहिल्या डबल हेडर सामन्यात राजस्थानने टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमधून अंकित राजपूतला बाहेरचा रास्ता दाखवला आणि महिपाल लोमरोरला संधी दिली. दुसरीकडे, आरसीबीने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.