आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हा सामना बंगलोर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. राजस्थान संघाने आयपीएलच्या 12 व्या सीजनमध्ये आतापर्यंत पाच सामने जिंकले असून सात सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली होती. राजस्थान संघ 10 पाईंट्ससह 7 व्या स्थानी आहे. मागील दोन सामने जिंकल्यानंतर आजचा सामना देखील खिशात घालण्यासाठी राजस्थान संघ सज्ज झाला आहे. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी संघाला उरलेले दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. या सामन्यानंतर राजस्थानचा कर्णधार स्टीवन स्मिथ वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
तर दुसरीकडे विराट कोहलीचा बंगलोर संघ प्लेऑफमधून बाहेर झाला आहे. बंगलोर संघाने 12 पैकी 4 सामने जिंकले असून 8 सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली आहे. हा संघ 8 पॉईंट्ससह स्पर्धेत शेवटच्या स्थानी आहे.
कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?
हैद्राबाद विरुद्ध पंजाब हा सामना तुम्ही टीव्ही प्रमाणे ऑनलाईन देखील पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
बंगलोर विरुद्ध राजस्थान नाणेफेक
Match 49. Rajasthan Royals win the toss and elect to field https://t.co/n6dU6CnUDi #RCBvRR #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2019
बंगलोर विरुद्ध राजस्थान या आजच्या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
असे असतील दोन्ही संघ:
बंगलोर: विराट कोहली (कर्णधार), अब्राहम डिविलियर्स, पार्थिव पटेल, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमेयर, शिवम दूबे, वाशिंगटन सुंदर, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, हेनरिक क्लासेन , मोइन अली, कोलिन डी ग्रांडहोम, पवन नेगी, टिम साउदी, अक्षदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदत्त पडिक्कल, गुरकीरत सिंह, प्रार्थना रे बर्मन, कुलवंत खेजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंह, कीमो पॉल, जलज सक्सेना, बंडारू अयप्पा.
राजस्थान: अजिंक्य रहाणे, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिडला, एस. मिधुन, प्रशांत चोप्रा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, स्टीव स्मिथ (कर्णधार), जोफ्रा आर्चर, ईश सोढी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, जयदेव उनादकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंग, लियाम लिविंगस्टोन, शुभम रंजाने, मनन वोहरा, एश्टन टर्नर, रियान पराग.