Virat Kohli 200th IPL Match: विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा प्रत्येक वेळी एक नवा इतिहास रचला जातो आणि एखाद्या विक्रम मोडला जातो. आयपीएल (IPL) 2020 च्या 31व्या सामन्यात विराट कोहलीने एक नवीन विक्रम नोंदविला आहे. आजच्या सामन्यात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची (Royal Challengers Bangalore) किंग्स इलेव्हन पंजाबशी (Kings XI Punjab) लढत सध्या शारजाह क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. कोहली जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला ज्याने एका संघासाठी सामन्यांचे दुहेरी शतक झळकावले. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल सामना विराटचा आरसीबीकडून (RCB) 200 वा सामना ठरला. तो संघासाठी 200 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला. कोहली आरसीबीकडून 185 आयपीएल सामने आणि 15 चॅम्पियन्स लीग सामने खेळला आहे. विशेष म्हणजे कोहली रॉयल चॅलेंजर्सकडून केवळ 4 सामन्याला मुकला आहे. तो आयपीएल 2008 मध्ये रॉयल चॅलेंजर्स फ्रँचायझीमध्ये सामील झाला होता. (RCB vs KXIP, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने टॉस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; KXIPमध्ये ख्रिस गेल याला अखेर संधी)
कोहलीने त्याच्या आरसीबीकडून त्याच्या 200 सामन्यानिमित्त म्हटले की आरसीबीसाठी 200 सामने खेळणे अकल्पनीय आहे. 2008 मध्ये मी याची कल्पनाही केली नव्हती. त्याने मला आपल्याबरोबर कायम ठेवले हे माझ्यासाठी सन्मान आहे. दरम्यान, विराटने 38.55 च्या सरासरीने आणि 131.41च्या स्ट्राइक रेटने 5668 धावा केल्या आहेत. त्याने पाच शतकं आणि 38 अर्धशतकंही ठोकली आहेत. याशिवाय आजच्या या खास सामन्यापूर्वी विराट पूर्ण उत्साहात दिसला. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना सुरु होण्यापूर्वी प्रशिक्षण सत्रात बॉलिवूड गाण्यावर विराट थिरकताना दिसला. पाहा 'किंग कोहली'चा डान्सिंग विडिओ:
King Kohli Dance.😍😍😍
Quote the Tweet and Say How is it... #ViratKohli @imVkohli #PlayBold #RCBvKXIP pic.twitter.com/lUGPp3mzJg
— 𝙑𝙞𝙧𝙖𝙩 𝙆𝙤𝙝𝙡𝙞 𝙏𝙧𝙚𝙣𝙙𝙨 * (@Trend_VK) October 15, 2020
दुसरीकडे, आजच्या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकला आणि किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही पंजाबने तीन बदल केले आहेत. 7 सामन्यानंतर अखेर 'युनिव्हर्स बॉस' क्रिस गेलला खेळण्याची संधी मिळाली आहे. गेलचा आयपीएल 13 मधील हा पहिला सामना आहे. यंदा आयपीएलच्या प्ले-ऑफ फेरीत स्थान मिळवण्याचं आव्हान कायम ठेवायचं असेल, तर किंग्स इलेव्हनला आजचा सामना जिंकणं गरजेचं आहे. पंजाबने यंदा आजवर 7 पैकी फक्त 1 सामना जिंकला असून 6 संनयात त्यांचा पराभव झाला आहे.