रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: File Photo)

RCB vs KXIP, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यातील आयपीएलचा (IPL) 31वा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरु होईल. बेंगलोर आणि पंजाब यांच्यातील आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात पंजाबसाठी विजय मिळवणे आवश्यक असेल, तर बेंगलोर आजच्या सामन्यात विजयी झाल्यास गुणतालिकेत अव्वल स्थान गाठेल. आजच्या सामन्यासाठी पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत आरसीबी 10 गुणांसह तिसऱ्या तर पंजाब संघ सहा पराभवासह तळाशी आहेत. पंजाबने आजवरचा आपला एकमात्र विजय आरसीबीविरुद्ध मिळवला होता. अशास्थितीत आज देखील राहुलचे किंग्स इलेव्हन मागील विजयाची पुनरावृत्ती करू पाहत असतील. (IPL 2020: DRS संदर्भात RCB कर्णधार विराट कोहलीचा प्रस्ताव; 'कर्णधारांना वाईड बॉल, नो-बॉलबाबत डीआरएस घेण्याची संधी हवी!')

दरम्यान, पंजाबने अखेर प्लेइंग इलेव्हनने क्रिस गेलला संधी दिली आहे. राहुल आणि मयंक अग्रवाल पंजाबकडून सलामीला येतील. यंदाच्या मोसमात गेलने एकही सामना खेळला नव्हता. गेल, निकोलस पूरन, दीपक हूडा हे मध्यक्रमात दिसू शकतात. या गोलंदाजीत क्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, एम अश्विन आणि अर्शदीप सिंह यांचा समावेश आहे. हूडा आजच्या सामन्यातून पंजाबकडून डेब्यू करत आहे. दुसरीकडे, आरसीबीने मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. बेंगलोर संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आरोन फिंच आणि देवदत्त पडिक्कल डावाची सुरुवात करतील. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे आणि क्रिस मॉरिस मधल्या फळीतची जबाबदारी सांभाळतील. गोलंदाजीत नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, इसरू उडाना, मोहम्मद सिराज यांचा समावेश झाला आहे.

पाहा आरसीबी आणि किंग्स इलेव्हनचा प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), आरोन फिंच, देवदत्त पडिक्कल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, इसरू उडाना आणि मोहम्मद सिराज.

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन), क्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, दीपक हूडा, ग्लेन मॅक्सवेल, क्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, एम अश्विन आणि अर्शदीप सिंह.