RCB vs KKR, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएलचा (IPL) धमाकेदार सामना आज थोड्याच वेळात सुरु होणार आहे. आरसीबी (RCB) आणि केकेआरचा (KKR) 28वा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळला जाईल. आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएलच्या 13व्या सत्रात नाईट रायडर्स उत्कृष्ट लयीत असल्याचे दिसून आले आणि 8 गुणांसह गुणतालिकेत तिसर्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, आरसीबीने 8 गुणांसह चौथ्या स्थानावर कब्जा केला आहे. केकेआरने या मोसमात 6 सामने खेळले असून त्यापैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 2 सामन्यांत पराभूत झाले आहेत. दुसरीकडे, आरसीबीने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत. (RCB vs KKR, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
आयपीएलच्या इतिहासात आजवर नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात 24 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये दोन वेळच्या चॅम्पियन संघचा वरचष्मा दिसत आहे. केकेआरने या 24 सामन्यात 14 वेळा विजय मिळविला आहे. दुसरीकडे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 10 वेळा विजयाचा स्वाद घेतला आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात आरसीबीने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल आहे. गुरकीरत सिंह मानच्या जागी आरसीबीने आजच्या सामन्यासाठी मोहम्मद सिराजचा समावेश केला आहे. दुसरीकडे, केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील एक बदल झाला आहे. नाईट रायडर्सने सुनील नारायणला बाहेर केले असून त्याच्या जागी टॉम बंटनला संधी दिली आहे. बंटन आजच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करेल.
पाहा आरसीबी आणि केकेआरचा प्लेइंग इलेव्हन
आरसीबी: आरोन फिंच, देवदत्त पद्धिकल, विराट कोहली, एबी डिविलियर्स, क्रिस मॉरिस, शिवम दुबे, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, वॉशिंगटन सुंदर आणि इसुरु उडाना.
केकेआर: राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नितीश राणा, इयन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, टॉम बंटन, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा, पॅट कमिन्स आणि कमलेश नागरकोटी.