PC-X

IPL Points Table 2025 Update: आयपीएल 2025 मध्ये एका रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा (MI) पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने (RCB) 20 षटकांत 221 धावांचा डोंगर उभा होता. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने सामना 12 धावांनी सामना गमावला. एकेकाळी असे वाटत होते की, मुंबई इंडियन्सचा संघ हा सामना जिंकू शकेल. पण आरसीबीच्या गोलंदाजांनी शेवटच्या क्षणी मुंबईच्या तोंडचा घास हिरावला आणि संघाला विजय मिळवून दिला. या स्पर्धेत आरसीबीचा हा तिसरा विजय आहे. आयपीएलमधील (IPL) प्रत्येक सामन्यानंतर, सर्वांचे लक्ष पॉइंट्स टेबलवर असते. कारण लीग स्टेजपर्यंतची संपूर्ण लढत फक्त त्यासाठीच असते. गुण आणि नेट रन रेट संघाच्या स्थानावर परिणाम करतात.

कालच्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) मुंबई इंडियन्स (MI) ला 12 धावांनी पराभूत करून विजयाची नोंद केली. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. जिथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10 वर्षांनी या मैदानावर विजय मिळवला. या विजयासह, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 4 सामन्यांत 3 विजयांसह 6 गुण झाले आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने 5 पैकी 4 सामने गमावले आहेत आणि ते 8 व्या स्थानावर आहेत. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स संघ पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्स संघ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब चौथ्या स्थानावर आहे. केकेआर पाचव्या स्थानावर आहे आणि लखनऊ सुपरजायंट्स संघ सहाव्या स्थानावर आहे. राजस्थान सातव्या स्थानावर आहे आणि मुंबई इंडियन्सचा संघ आठव्या स्थानावर आहे. याशिवाय, चेन्नई नवव्या स्थानावर आहे आणि सनरायझर्स हैदराबाद सध्या शेवटच्या स्थानावर आहे.

हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने वादळी खेळी केली. हार्दिकने 15 चेंडूत 42 धावा केल्या, तर तिलकने 29 चेंडूत 56 धावा केल्या. एकेकाळी असे वाटत होते की, मुंबई हा सामना सहज जिंकेल. पण भुवीने सामना फिरवला.

आयपीएल 2025 अपडेटेड पॉइंट्स टेबल:

संघ मॅच विजय पराभव टाय अनिर्णीत गुण नेट रन रेट
दिल्ली कॅपिटल्स 3 3 0 0 0 6 +1.257
गुजरात टाइटन्स 4 3 1 0 0 6 +1.031
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 4 3 1 0 0 6 +1.014
पंजाब किंग्ज 3 2 1 0 0 4 +0.074
कोलकाता नाइट राइडर्स 4 2 2 0 0 4 +0.070
लखनऊ सुपर जायंट्स 4 2 2 0 0 4 +0.048
राजस्थान रॉयल्स 4 2 2 0 0 4 -0.185
मुंबई इंडियन्स 5 1 4 0 0 2 -0.011
चेन्नई सुपर किंग्ज 4 1 3 0 0 2 -0.891
सनराइजर्स हैदराबाद 5 1 4 0 0 2 -1.629