
RR vs GT IPL 2025 47th Match: आयपीएल 2025चा 47 वा (IPL 2025) सामना 28 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (GT vs RR) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने गुजरातचा 8 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 4 गडी गमावून 209 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने 84 धावा केल्या तर जोस बटलरने नाबाद अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात, वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक शतकाच्या जोरावर राजस्थानने 15.5 षटकांत 210 धावांचे लक्ष्य गाठले. या विजयासह राजस्थानने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
Match 47. Rajasthan Royals Won by 8 Wicket(s) https://t.co/HvqSuGgTlN #RRvGT #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2025
बटलर-गिलची वादळी खेळी
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून 209 धावा केल्या. गुजरात टायटन्सडून कर्णधार शुभमन गिलने 84 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, गिलने 50 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, साई सुदर्शनने 39 तर जोस बटलरने 50 धावा केल्या. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सकडून महेश थीकशनाने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा: Vaibhav Suryavanshi Century: 11 षटकार आणि 7 चौकारांसह, 14 वर्षाय वैभव सूर्यवंशीने 35 चेंडूत झळकावले तुफानी शतक, अनेक विक्रम केले नावावर
वैभव सूर्यवंशीचे स्फोटक शतक
त्यानंतक, वैभव सूर्यवंशीचे झंझावाती शतक आणि यशस्वी जयस्वालच्या उत्कृष्ट अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने जयपूरमध्ये गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला. वैभवने 38 चेंडूत 11 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. त्याच वेळी, जयस्वालने 40 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 70 धावांची नाबाद खेळी केली. दोघांनीही 166 धावांची सलामी भागीदारी करून गुजरातचे कंबरडे मोडले. त्यामुळे राजस्थानने 210 धावांचे लक्ष्य केवळ 15.5 षटकांत पूर्ण केले. या विजयासह, राजस्थानने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.