
SRH vs DC IPL 2025 55th Match: आयपीएल 2025 चा 55 वा (IPL 2025) सामना 5 मे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (SRH vs DC) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला गेला. पण, सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आयपीएल 2025 मधील हैदराबादचा प्रवास संपला आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्ली संघाला फक्त 133 धावा करता आल्या. दिल्लीचा डाव पूर्ण होताच. सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि हैदराबाद संघ फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. यानंतर, मैदान खूप ओले असल्याने, पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
❌ CSK
❌ RR
❌ SRH
Last year's runners-up become the third team to be out of the IPL 2025 playoff race pic.twitter.com/CiODW7CNts
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 5, 2025
पॅट कमिन्सने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट
प्रथम फलंदाजी करताना पंजाब दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 133 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून स्फोटक फलंदाज आशुतोष शर्माने 41 धावांची जलद खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 26 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार मारले. अशुतोष शर्मा व्यतिरिक्त ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 41 धावांचे योगदान दिले. सनरायझर्स हैदराबादकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तसेच जयदेव उनाडकट, हर्षल पटेल आणि एशान मलिंगा प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पंचांनी सामना रद्द करण्याचा घेतला निर्णय
दिल्लीचा डाव पूर्ण होताच. सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि हैदराबाद संघ फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. यानंतर, मैदान खूप ओले असल्याने, पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.