
आशिया कप 2023 ला (Asia Cup 2023) धमाकेदार सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा 238 धावांनी पराभव केला आहे. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला. आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कँडीच्या मैदानावर 2 सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमध्ये शानदार सामना रंगणार आहे. दोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंची फौज आहे, जे काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलू शकतात. या सामन्यात पाऊस पडला तर निकाल लागण्यासाठी किती षटकांची गरज आहे. आम्ही त्याबद्दल तुम्हाला माहिती देवू... (हे देखील वाचा: IND vs PAK Asia Cup 2023: पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळतील 'हे' युवा खेळाडू, प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा निश्चित)
भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे संकट
Google Weather नुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान दिवसभर दाट ढगांसह पावसाची 56% ते 78% शक्यता आहे. उद्या दिवसभर पाऊस पडल्यास सामना रद्द होऊ शकतो. त्याचवेळी अधूनमधून पाऊस पडत असेल तर डकवर्थ लुईस नियम लागू होऊ शकतो. कोणत्याही एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियम लागू करण्यासाठी 20 षटकांचा खेळ असणे अत्यंत आवश्यक आहे.
केव्हा लागू होणार डकवर्थ लुईस नियम
समजा या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानला 300 धावांचे लक्ष्य दिले. यानंतर पाकिस्तानी संघाने 15 षटकात 100 धावा केल्या, त्यानंतर सामन्यात पाऊस आला आणि जर दिवसभर पाऊस थांबला नाही तर सामना रद्द होईल. कारण एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियम लागू करण्यासाठी 20 षटकांचा खेळ असणे आवश्यक आहे. त्याचवेळी पाकिस्तानने 20 षटकांची फलंदाजी केली आणि त्यानंतर पाऊस पडला तर डकवर्थ लुईस नियम लागू होईल आणि सामन्याचा निकाल लावता येईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होवु शकतो 20-20 षटकांचा
त्याच वेळी, पाकिस्तानी संघ फलंदाजी करत असताना 15 षटकांनंतर काही काळ पाऊस पडला आणि नंतर थांबला, तर 15 षटकांनंतर खेळ सुरू होईल, परंतु पंच 15 षटकांनंतर पाकिस्तानला नवीन लक्ष्य देईल. डकवर्थ-लुईस नियमानुसार, पावसानंतर उरलेल्या वेळेत लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला पंचांकडून नवीन लक्ष्य दिले जाते. उरलेल्या विकेट्स आणि उरलेल्या षटकांचा विचार करून लक्ष्य दिले जाते. सामन्यात पावसाची शक्यता आहे आणि सर्व चाहत्यांची इच्छा आहे की सामन्याचा निकाल यावा, यासाठी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात 20-20 षटकांचा असणे खूप महत्वाचे आहे.
टीम इंडिया आहे वरचढ
एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 13 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने 7 आणि पाकिस्तानने 5 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारताने 7 वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी संघाला केवळ 2 वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावण्यात यश आले आहे.