KKR vs PBKS, IPL 2024: आयपीएल 2024 च्या 42 व्या (IPL 2024) सामन्यात शुक्रवारी पंजाब किंग्जने इतिहास रचला. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून पराभव (PBKS Beat KKR) केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 261 धावा केल्या. फिल सॉल्ट (75) आणि सुनील नरेन (71) यांनी अर्धशतक ठोकले. प्रत्युत्तरात पंजाब संघाने 18.4 षटकांत 262 धावा केल्या. आयपीएलमधील हा सर्वात मोठा पाठलाग आहे. या सामन्यादरम्यान अनेक विक्रम झाले. याशिवाय हे 3 खेळाडू पंजाबच्या विजयाचे हिरो ठरले. (हे देखील वाचा: ICC Men's T20 World Cup 2024: आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने युवराज सिंगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून केली नियुक्ती, पोस्ट शेअर करुन दिली माहिती)
आयपीएलमधील सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग
262 धावा: पीबीकेएस विरुद्ध केकेआर (2024)*
224 धावा: आरआर विरुद्ध केकेआर (2024)
224 धावा: आरआर विरुद्ध पीबीकेएस (2020)
219 धावा: एमाआय विरुद्ध सीएसके (2021)
215 धावा: आरआर विरुद्ध डीईसी (2008)
215 धावा: हैदराबाद विरुद्ध राजस्थान (2023)
215 धावा: एमआय विरुद्ध पीबीकेएस (2023)
For his phenomenal show with the bat in a record chase, Jonny Bairstow bags the Player of the Match Award 🏆
Scorecard ▶️ https://t.co/T9DxmbgIWu#TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/G3HVTUmOJF
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2024
आयपीएलमध्ये सर्वाधिक 200 धावांचा पाठलाग
7 – पंजाब*
5 – मुंबई
3- राजस्थान
3 – चेन्नई
3 – कोलकाता
3 - लखनौ
प्रभसिमरन सिंग
262 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जला प्रभसिमरन सिंगने धडाकेबाज सुरुवात केली. त्याने 270 च्या स्ट्राईक रेटने 20 चेंडूत 54 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 5 षटकार आले. मात्र, प्रभसिमरन दुर्दैवाने धावबाद झाला. त्याच्या आणि जॉनी बेअरस्टोमध्ये पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी झाली.
जॉनी बेअरस्टो
फॉर्मशी झगडत असलेल्या जॉनी बेअरस्टोने कोलकाताविरुद्ध शतक झळकावले. त्याने 48 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 9 षटकार मारले. रिले रुसोसोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी 85 धावा जोडल्या. तसेच त्याच्या आणि शशांक सिंगमध्ये 84 धावांची भागीदारी झाली.
शशांक सिंग
आयपीएल 2024 मध्ये आपले फलंदाजीचे पराक्रम सिद्ध करणारा शशांकही या सामन्यात खेळला. त्याने 28 चेंडूत 68* धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 8 षटकार आले.