Heart Attack and Cricket | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Cricketer Dies due to Heart Attack: पुणे Pune येथील हडपसर (Hadapsar) परिसरात क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. तो केवळ 14 वर्षांचा होता. वेदांत धामणगावकर (Vedanta Dhamangaonkar) असे या चिमूकल्याचे नाव आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तो मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेला होता. दरम्यान, त्याच्या छातीत अचानक दुखू लागले आणि तो खाली बसला. उपस्थित मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत केले.

दरम्यान, वेदांत याच्या छातीत दुखू लागल्यानंतर मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्याचे मित्र त्याला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेले खरे. मात्र तोपर्यंत वेदांत याची प्राणज्योत मालवली होती. दुसऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वेदांत याचा मृत्यू झाला असावा असे डॉक्टर म्हणाले. (हेही वाचा, Cricketer Dies in Pune: क्रिकेट खेळताना लागला दम, 22 वर्षीय खेळाडूचा जागीच मृत्यू)

हृदयविकाराची लक्षणे

छातीत दुखणे किंवा अस्वस्थता, श्वास लागणे, मळमळ किंवा उलट्या होणे, घाम येणे, डोके दुखणे आणि एक किंवा दोन्ही हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटात अस्वस्थता किंवा वेदना यांचा समावेश असू शकतो. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आढळल्यास, ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. उपचार पर्यायांमध्ये रक्ताची गुठळी विरघळण्यासाठी औषधे, अवरोधित धमनी उघडण्यासाठी अँजिओप्लास्टी किंवा अवरोधित धमनीच्या आसपास रक्त वाहून जाण्यासाठी नवीन मार्ग तयार करण्यासाठी बायपास शस्त्रक्रिया यांचा समावेश असू शकतो.

हृदयविकाराचा झटका रोखण्यासाठी नियमित व्यायाम, निरोगी आहार, धूम्रपान टाळणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या अंतर्निहित वैद्यकीय स्थितींवर उपचार करणे यासह निरोगी जीवनशैली राखणे समाविष्ट आहे.