पुणे (Pune) येथे क्रिकेट खेळणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे. क्रिकेट (Cricket ) खेळताना दम लागून या तरुणाचा मृत्य्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे येथील हडपसर (Hadapsar) परिसरातील हांडेवाडी (Handewadi) मैदानावर क्रिकेट खेळताना ही घटना घडली. श्रीतेज सचीन घुले असे या तरुणाचे नाव आहे. अशा प्रकारे मृत्यू होण्याची पुण्यातील ही दुसरी घटना आहे. या आधीही पुण्यातील बोरी बुद्रुक येथील जाधववाडी गावात क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचा मृत्यू झाला होता . श्रीतेज याच्या मृत्यूमुळे त्याचा मित्रपरिवार, कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. क्रीडा वर्तुळातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रीतेज घुले याला क्रिकेट खेळाची प्रचंड आवड होती. तो नेहमीच आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असे. ही घटना घडली त्या दिवशी म्हणजेच रविवारी (12 जून) सकाळीही तो नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळण्यासाठी सकाळी सात वाजण्याच्या सुमारासच मित्रांसोबत घराबाहेर पडला. तो आपल्या मित्रांसोबत हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील मौदानावर आला. तो क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळताना अचानक त्याला दम लागला आणि तो खाली कोसळला. त्याच्या इतर मित्रांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्याने प्रतिसाद देणेच थांबवले. घाबरलेल्या मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासताच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. (हेही वाचा, क्रिकेटपटू Babu Nalawade याचा खेळताना मृत्यू; नीयतीने क्रिकेटच्या मैदानावर घेतली त्याच्या आयुष्याची विकेट)
रविवारी श्रीतेज हा सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. पुण्यातील हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील मैदानावर 22 वर्षीय श्रीतेज घुले क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळत असताना अचानक दम लागल्याने तो खाली कोसळला. श्रीतेजच्या इतर मित्रांनी त्याच्यावर त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. श्रीतेज काहीच प्रतिसाद देत नसल्याचं इतर मित्रांना लक्षात येताच त्यांनी श्रीतेजला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
श्रीतेजच्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती दिल्यावर त्यांना धक्का बसला. त्याच्या आकस्मित निधनानाने हडपसर परिसरात शोककळा पसरली आहे. श्रीतेज आणि त्याचा परिवार हडपसर परिसरात राहतात. त्याला मोठा मित्रपरिवार देखील आहे. घरातून सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी निघालेला श्रीतेज घरी कधीच पोचणार नाही, असं कुटुंबीयांना देखील वाटलं नव्हतं. मात्र काही तासातच होत्याचं नव्हतं झालं. श्रीतेजच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.