PSL 2021: पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळाडू COVID-19 पॉसिटीव्ह, स्पर्धा अनिश्चित वेळेसाठी स्थगित
अधिकृत पीएसएल लोगो (@thePSLt20/Twitter)

PSL 2021: कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीचा फटका पाकिस्तानच्या टी-20 लीग पाकिस्तान सुपर लीगलाही (Pakistan Super League) बसला. कराची येथे सुरु असलेल्या स्पर्धेत अनेक खेळाडू कोविड-19 (COVID-19) पॉसिटीव्ह प्रकरण आढळल्याने स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. जर आकडेवारीचा विचार केला तर या लीगमध्ये एकूण 34 सामने खेळले जायचे होते, परंतु केवळ 14 सामने खेळले गेले त्यानंतर खेळाडू आणि अधिकारी कोरोना पॉसिटीव्ह आढल्याने मंडळाला हा मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. आतापर्यंत या लीगमध्ये जगभरात खेळलेल्या एकूण 7 खेळाडूंना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, लीग रद्द झाल्यानंतर सर्व परदेशी खेळाडू आपापल्या देशात परत येऊ लागले आहेत. तथापि, कोरोना व्हायरसग्रस्त खेळाडू सध्या पाकिस्तानमध्ये क्वारंटाइन राहतील आणि त्यांच्यावर उपचार केले जातील. ()

गुरुवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, आणखी तीन खेळाडूंना जीवघेण्या विषाणूची लागण झाली आहे. बुधवार, 3 मार्च रोजी कराची किंग्ज विरुद्ध पेशावर झाल्मी आणि क्वेटा ग्लेडिएटर्स विरुद्ध मुलतान सुल्तान यांच्यात झालेल्या डबल-हेडर सामन्यात अज्ञात खेळाडू सहभागी नसल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. त्याच दिवशी पीसीबीने घोषित केले की कराची किंग्जकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅनियल ख्रिश्चनने पीएसएलमधून माघार घेतली असून तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. त्याआधी इंग्लंडचा फलंदाज टॉम बंटन आणि आणखी एका विदेशी खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह असल्याचंही स्पष्ट केले होते आणि तो क्वारंटाइन होता. पीसीबी मीडियाचे संचालक समी-उल हसन बुर्नी यांनी मंगळवारी जाहीर केले होते की दोन परदेशी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यातील एका सदस्याला या विषाणूची सकारात्मक लागण झाली आहे.

दरम्यान, COVID-19 च्या उद्रेकानंतर प्लेऑफच्या अगदी आधी मागील वर्षी देखील स्पर्धा स्थगित करण्यात आली होती त्यानंतर उर्वरित सामने नंतर नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात आले होते. “संघ मालकांशी झालेल्या बैठकीनंतर आणि सर्व सहभागींचे आरोग्य व कल्याण महत्वाचे असल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग 6 त्वरित प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या स्पर्धेत 7 सकारात्मक प्रकरणे आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला,” पीसीबीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.