IPL 2019 (File Photo)

बंगालच्या अवघ्या सोळ्या वर्षीय लेग स्पिनर प्रयास रे बर्मन(Prayas Ray Barman) या युवा खेळाडूने नवा विक्रम रचला आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात कमी वर्षांचा खेळाडू म्हणून त्याने आज पदार्पण केलं आहे. आयपीएलच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) या संघातून प्रयासने आयपीएलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आज हैदराबाद संघाविरुद्ध मैदानात उतरलेल्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्रयास रे बर्मन क्रिकेट चाहत्यांमधील आज चर्चेचा विषय बनला आहे. तर पहा प्रयास बदद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी

कोण आहे प्रयास रे बर्मन?

  • प्रयासचा जन्म 25 ऑक्टोबर 2002 साली दुर्गापूर मध्ये झाला. त्याचे वडील डॉक्टर आहेत तर बहीण आय टी क्षेत्रामध्ये काम करते.
  • सुरुवातीला दुर्गापूर आणि पुढे दिल्लीमध्ये प्रयासने क्रिकेटचे धडे गिरवले.
  • प्रयास बंगालच्या अंडर १५ संघाचा भाग आहे. या संघातही त्याची चमकदार कामगिरी लक्षवेधी ठरली होती.
  • विजय हजारे चषक स्पर्धेत त्यानं बंगालकडून लिस्ट A क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
  • प्रयास हा ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वोर्नचा चाहता आहे.
  • RCBने प्रयासला 1.50 कोटी रुपयांत त्याला खरेदी केले. 20 लाख मूळ किंमत असलेल्या प्रयासला संघात घेण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाबही उत्सुक होते

(IPL 2019 Full Schedule: 23 मार्च ते 5 मे दरम्यान रंगणार्‍या VIVO IPL 12 चे वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा; जाणून घ्या कधी, कुठे रंगणार आयपीएलचे सामने )

आईपीएल मध्ये पदार्पण करणारे युवा खेळाडू

प्रयास राय बर्मन (16 वर्ष 157 दिवस)

मुजीब-उर-रहमान (17 वर्ष 11 दिवस)

सरफराज खान (17 वर्ष 177 दिवस)

प्रदीप सांगवान (17 वर्ष 179 दिवस)

वॉशिंगटन सुंदर (17 वर्ष 199 दिवस)

आयपीएलच्या या हंगामात प्रयासच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.