
Portugal National Cricket Team vs Norway National Cricket Team 3rd T20 2025 Live Streaming: पोर्तुगाल राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि नॉर्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज तिसरा टी 20 सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अल्बर्टा येथील सांतारेम क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. तीन सामन्यांची टी-20 मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. नॉर्वेने पहिला टी20 39 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या टी-20 मध्ये पोर्तुगालने जबरदस्त पुनरागमन केले आणि 4 विकेट्सने विजय मिळवला. आता मालिकेतील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात जिंकणारा संघ मालिका जिंकेल. अशा परिस्थितीत पोर्तुगालचे कर्णधारपद नज्जाम शहजादच्या हाती असेल. तर नॉर्वेचे नेतृत्व खिजार अहमद करेल. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो. TATA IPL Points Table 2025 Update: पंजाब किंग्जकडून चेन्नई सुपर किंग्जचा पराभव; पॉइंट्स टेबलमध्ये पंजाब चौथ्य स्थानी
पोर्तुगाल आणि नॉर्वे यांच्यातील तिसरा टी 20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
पोर्तुगाल आणि नॉर्वे यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज म्हणजेच 9 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता अल्बर्टाच्या सांतारेम क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल.
पोर्तुगाल आणि नॉर्वे यांच्यातील तिसरा टी 20 सामना कुठे पाहायचा?
पोर्तुगाल आणि नॉर्वे यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. तथापि, भारतात टीव्हीवर त्याचे थेट प्रक्षेपण कसे होईल याबद्दल कोणतीही माहिती नाही.
दोन्ही संघांचे खेळाडू
पोर्तुगाल: नज्जम शहजाद (कर्णधार), अमनदीप सिंग, मिगुएल मचाडो (यष्टीरक्षक), कॉनराड ग्रीनशिल्ड्स, जुआन हेन्री, जल्पेश विजय, धवलकुमार नोरोतम, राहुलकुमार हाशू, उपेन शांतू, एमडी सिराज निपो, शर्मन वाझ
नॉर्वे: कुरुगे अबेरत्न, खिजर अहमद (कर्णधार आणि यष्टिरक्षक), विनय रवी, अहमदउल्ला शिनवारी, उस्मान आरिफ, कमर मुश्ताक, जुनैद महमूद हुसेन, अनिल परमार, शेर सहक, फैसल रझा, विशाल शर्मा