आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad Narendra Modi Stadium) होणार आहे. हा शानदार सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्वतः अहमदाबादला पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) देखील उपस्थित राहणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि डेप्युटी पीएम रिचर्ड मार्लेस यांनाही निमंत्रण पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दोघांकडूनही दुजोरा मिळण्याची प्रतीक्षा आहे. 20 वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. याआधी 2003 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे हा जेतेपदाचा सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाला 125 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. (हे देखील वाचा: Bad News For Indian Fans: हार्दिक पांड्या आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतून पडणार बाहेर, बुधवारी संघ होणार जाहीर)
Prime Minister Narendra Modi to be Guest of Honor at ICC World Cup 2023 Final in Ahmedabad on November 19. India set to face Australia after a thrilling victory against South Africa in the semi-final.@narendramodi #NarendraModiStadium #INDvsAUS #WorldcupFinal #ICCWorldCup2023 pic.twitter.com/eEVT60TLCD
— Jan Ki Baat (@jankibaat1) November 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)