ICC Women's T20 World Cup 2024: युएईमध्ये 3 ऑक्टोबरपासून महिला टी-20 विश्वचषकाला(Women's T20 World Cup) सुरुवात होत आहे. 2022 मध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकाच्या शेवटच्या हंगामानंतर भारत इतिहास रचण्याच्या तयारी आहे. 2022 मध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकात भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने विश्वचषकावर नाव कोरले होते. महिला टी 20 विश्वचषकात आत्तापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंविषयी जाणून घेऊयात. (हेही वाचा: ICC Women T20 World Cup 2024: 3 ऑक्टोबरपासून रंगणार टी-20 महिल विश्वचषकाचा थरार; 10 संघ आमनेसामने, पाहा संपूर्ण सामन्याचे वेळापत्रक, गट आणि संघांची माहिती)
मेग लॅनिंग
ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंगने 2014 च्या हंगामात आयर्लंडविरुद्ध 65 चेंडूत 193.84 च्या स्ट्राइक रेटने 126 धावा केल्या होत्या. ती सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
डिआंड्रा डॉटिन
वेस्ट इंडिजची फलंदाज डिआंड्रा डॉटिनने 2010 च्या हंगामात 248.88 च्या स्ट्राइक रेटने 45 चेंडूत नाबाद 112 धावांची खेळी केली होती. ती सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
हेदर नाइट
इंग्लंड महिला संघाची कर्णधार हेदर नाइटने 2020 च्या हंगामात 163.63 च्या स्ट्राइक रेटने 66 चेंडूत नाबाद 108 धावांची खेळी केली होती. हीदर नाइट हिने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान राखले आहे.
हरमनप्रीत कौर
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने 2018 च्या हंगामात 51 चेंडूत 201.96 च्या स्ट्राइक रेटने 103 धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हरमनप्रीत कौर चौथ्या स्थानावर आहे.
मुनीबा अली
2023 च्या हंगामात 150 च्या स्ट्राइक रेटने 68 चेंडूत 102 धावांची खेळी केली होती. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मुनीबा अली चौथ्या स्थानावर आहे.