कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) स्थगित करण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) आयोजन करण्यासाठी आशिया कपच्या (Asia Cup) वेळापत्रकात झालेल्या कोणत्याही बदलांवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) आक्षेप घेईल, असे प्रतिपादन पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी केले. कोविड-19 आजाराशिवाय पीसीबी युएईमध्ये सप्टेंबरमध्ये ठरल्याप्रमाणे आशिया चषक टी-20 स्पर्धा आयोजित करण्याची अपेक्षा करीत असल्याचे खान म्हणाले. त्यांनी जी टीव्ही या वृत्तवाहिनीला सांगितले की, “आमची भूमिका स्पष्ट आहे. आशिया चषक सप्टेंबरमध्ये होणार असून तो केवळ आरोग्याच्या समस्यांमुळेच बदलला जाऊ शकतो. आयपीएलसाठी जर त्याचा कार्यक्रम बदलला असेल तर तो आम्हाला मान्य होणार नाही." आयपीएल स्पर्धा यंदा 29 मार्च पासून सुरु होणार होती पण, लॉकडाउनमुळे ती पहिले 15 एप्रिल आणि नंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. (Asia Cup 2020: बीसीसीआय अधिकाऱ्याचा मोठा खुलासा, एशिया कपच्या आयोजनावर केले 'हे' मोठे विधान)
पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान म्हणाले की, आयसीसीच्या मुख्य कार्यकारी बैठकीत बीसीसीआयच्या प्रतिनिधींनी आयपीएल विंडोचा मुद्दा उपस्थित केला नाही. ते म्हणाले, "मी ऐकले आहे की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एशिया कप आयोजित करण्याची चर्चा आहे, जे आमच्यासाठी शक्य नाही. आपण आशिया चषकात बदल केल्यास त्या सदस्या देशासाठी मार्ग तयार करणे ही एक कवायत आहे जी योग्य नाही आणि आम्ही त्याचे समर्थन करणार नाही." त्यावेळी झिम्बाब्वे संघ पाकिस्तान दौर्यावर असेल आणि त्यानंतर पाकिस्तानला न्यूझीलंडला जायचे आहे, असे वसीम खान यांनी सांगितले.
कोरोनामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे, परंतु परिस्थिती सुधारल्यास वर्षा अखेरीस टूर्नामेंट आयोजित होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे, परंतु त्याचा सर्वात भयानक परिणाम अमेरिकेत दिसून येत आहे. कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत सुमारे 50 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या कोविड-19 चे 2,718,139 रुग्ण समोर आले आले असून 190,635 लोकांनी आपला जीव गमावला आहे.