PBKS vs DC IPL 2021: मयंक अग्रवाल-दीपक हुड्डा यांच्यातील मैदानावरील गोंधळ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)
मयंक अग्रवाल आणि दीपक हुड्डा (Photo Credit: Twitter)

PBKS vs DC IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग 2021 (Indian Premier League) मधील पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील 29 व्या सामन्यात एक मजेदार क्षण आला जो क्रिकेट चाहत्यांना नक्कीच डोक्याला हात मारायला भाग पडेल. पंजाबचे फलंदाज मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि दीपक हुड्डा (Deepak Hooda) यांनी फलंदाजी दरम्यान अशी एक चूक केली ज्याचं नुकसान संघाला झाला. जेव्हा अक्षर पटेलने (Axar Patel) 14 व्या ओव्हरमधील तिसरा बॉल टाकला तेव्हा मयंक अग्रवालने एक्सट्रा कवरकडे शॉट मारला. फील्डर शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) वेगवान चेंडू उचला आणि नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने फेकला. अक्षर पटेलने देखील वेळ न गमावता विकेट उडवली. या सर्व गोलंदाला दोन्ही फलंदाज एकाचा टोकाला आले होते. ज्यानंतर अक्षरने चेंडू विकेटकीपर रिषभ पंतच्या (Rishabh Pant) दिशेने फेकला आणि पंतनेही चेंडूने बेल्स उडवल्या. (PBKS vs DC IPL 2021 Match 29: कर्णधार मयंक अग्रवालचे झुंजार अर्धशतक, पंजाबचे दिल्लीला विजयासाठी 167 धावांचे दमदार आव्हान)

मयंक-दीपकमधील हा गोंधळ पाहून अंपायरने अखेर थर्ड-अंपायरकडे निर्णय सोपवला ज्यांनी अखेर दीपकला तंबूत जाण्याचा इशारा दिला. नेमका मयंक अग्रवाल रन आऊट झाला का दीपक हुडा याचा निर्णय देताना थर्ड अंपायरही चक्रावला. दीपक 1 चेंडूत 1  धाव करून परतला. पंजाबची धावसंख्या 88/4 आणि 6 ओव्हरअधिक शिल्ल्क असताना ही घटना घडली. केएल राहुलच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणारा मयंक आक्रमक राहिला परंतु शतक पूर्ण करण्यापासून तो एक धाव कमी पडली व तो 99 धावांवर नाबाद परतला. मयंकने 58 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 99 धावांची नाबाद खेळी केली. यापूर्वी कर्नाटक रणजी संघाचे नेतृत्व करणाऱ्या मयंकने पुढाकाराने नेतृत्व करत त्यांच्यात कर्णधारपदाची क्षमता असल्याचे दाखवून दिले.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आजच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्सला मोठा धक्का बसला. केएल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे मयंकला पंजाबच्या टीमची कमान देण्यात आली. राहुलच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना पंजाबने प्रसिद्धीप्रत्रकात म्हण्टले की, “शनिवारी रात्री केएल राहुलच्या पोटात दुखत होतं, त्याला औषधं देण्यात आली, यानंतरही त्याला बरं वाटत नसल्यामुळे राहुलला इमर्जन्सी रूममध्ये नेण्यात आलं, तिकडे त्याच्यावर टेस्ट करण्यात आला. यामध्ये त्याला तीव्र ॲपेंडिक्स (appendicitis) झाल्याचं समोर आलं. यावर उपचारासाठी राहुलवर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.”