
Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल 2025 (IPL 2025) आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू (Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जने या हंगामातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. आरसीबीचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे आहे. तर, सीएसकेची कमान ऋतुराज गायकवाडकडे आहे. दरम्यान. चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरुने चेन्नईसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
With this total on this pitch, will RCB finally get that W at Chepauk? 👀 #CSKvRCB live: https://t.co/iigJca7fFW pic.twitter.com/exS96bmb5j
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 28, 2025
पाटीदारचे अर्धशतक, साल्ट-डेव्हिडची स्फोटक खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बगंळुरुने 20 षटकात 7 गडी गमावून 197 धावा केल्या. बगंळुरुकडूनन कर्णधार रजत पाटीदारने 51 धावांची शानदार खेळी केली. त्याने 32 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्याशिवाय विराट कोहलीने 31 तर फिलिप सॉल्ट 32 धावांचे योगदान दिले. तर शेवटी येवून टिम डेव्हिडने 8 चेंडून 22 धावांची स्फोटक खेळी केली. (हे देखील वाचा: RCB vs CSK: नजर हटी दुर्घटना घटी! विजेच्या वेगाने एमएस धोनीने सॉल्टला केले स्टंपिंग, पाहा व्हिडिओ)
नुर अहमदने घेतल्या तीन विकेट
दुसरीकडे, सीएसकेचा स्टार गोलंदाज नुर अहमदने चेन्नई सुपर किंग्ज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. चेन्नई सुपर किंग्जकडून नुर अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नुर अहमद व्यतिरिक्त मथीशा पाथिराणाने 2 विकेट घेतल्या. तर खलीली अहमद आणि आर अश्विनने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.