Pat Cummins (Photo Credit - Twitter)

Pat Cummins Welcome Second Baby: पॅट कमिन्सने श्रीलंकेविरुद्धच्या चालू कसोटी मालिकेतून दुसऱ्या बाळाच्या आगमानसाठी विश्रांती घेतली आहे. पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि त्याची पत्नी बेकी (Becky Cummins) यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. "गेल्या वेळी मी मुलगा अल्बीच्या जन्माच्या वेळी उपस्थित नव्हतो. यावेळी आमच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाच्या वेळी कुटुंबासोबत थोडा जास्त वेळ कसा घालवू शकतो यावर मी लक्ष देऊ इच्छितो," असे विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराने आधी म्हटले होते.

पॅट कमिन्सच्या घरी सोनपरीच आगमन

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Rebecca Jane Cummins (@becky_cummins)

कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

दरम्यान, दुखापतीमुळे कमिन्सला पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडावे लागले आहे. दुसरीकडे, पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियन संघातील एकमेव खेळाडू नाही जो या मालिकेला मुकला आहे. जोश हेझलवूड आणि मिशेल मार्श यांनाही दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.