
Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 1st T20 2025: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिला टी-20 सामना आज म्हणजे 28 मे रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल. तीन सामन्यांची ही मालिका पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश दोघांसाठीही तयारीचे मैदान ठरेल. विशेषतः घरच्या संघाला या फॉरमॅटमधील सततच्या निराशाजनक कामगिरी विसरून पुढे जायचे आहे. बांगलादेशचे नेतृत्व लिटन दासकडे आहे. तर सलमान अली आगा पाकिस्तानचे नेतृत्व करेल. दोन्ही संघ संतुलित आहेत. अशा परिस्थितीत, एक रोमांचक सामना अपेक्षित आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
🚨 Pakistan win the toss and elected to bat first!#PAKvBAN #ClashOfGreens pic.twitter.com/u1GOJXO8d0
— Ramzy 🇬🇧🇵🇰 (@Ramz_004) May 28, 2025
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
पाकिस्तानः फखर जमान, सैम अयुब, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, शादाब खान, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, हसन अली, हरिस रौफ, अबरार अहमद.
तनजीद हसन, परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (कर्णधार), तौहीद हृदोय, महेदी हसन, जाकेर अली (यष्टीरक्षक), शमीम हुसेन, रिशाद हुसेन, तन्झिम हसन साकिब, हसन महमूद, शरीफुल इस्लाम.