PAK Team (Photo Credit - Twitter)

विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) साठी पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल झाला आहे. गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच पाकिस्तानचा संघ (Pakistan Team) भारतात आला आहे. भारतात पोहोचल्यावर पाकिस्तानी संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले पण या सगळ्या दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदने (Mushtaq Ahmed) एक विधान केले आहे ज्याने भारतीय चाहते अजिबात खूश नाहीत. मुश्ताक अहमद म्हणाले की, हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त असल्याने पाकिस्तानी संघालाही अधिक पाठिंबा मिळेल. (हे देखील वाचा: PAK vs NZ, CWC 2023 Warm-Up Live Streaming: विश्वचषकाआधी होणार रंगीत तालीम, सराव सामन्यात पाकिस्तान - न्युझीलंड आमनेसामने; कुठे पाहणार लाइव्ह घ्या जाणून)

विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात निवड झालेल्या 15 खेळाडूंपैकी केवळ दोन खेळाडूंनी यापूर्वी भारत दौरा केला आहे. मोहम्मद नवाज आणि सलमान आगा अशी या दोन खेळाडूंची नावे आहेत. बाकीचे खेळाडू पहिल्यांदाच पाकिस्तानात आले असून त्यांचे येथे ज्या प्रकारे स्वागत करण्यात आले त्यामुळे ते खूप खूश आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने सोशल मीडियाद्वारे आपला आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, आत्तापर्यंत भारतात आमचे खूप चांगले स्वागत झाले आहे.

मुश्ताक अहमद यांनी केले धक्कादायक विधान 

मात्र, पाकिस्तानच्या वतीने मुश्ताक अहमद यांनी दिलेल्या वक्तव्यावर भारतीय चाहते अजिबात खूश नाहीत. पाकिस्तानच्या समा टीव्ही चॅनलवरील संवादादरम्यान ते म्हणाले, हैदराबाद आणि अहमदाबाद ही दोन शहरे आहेत जिथे मुस्लिमांची लोकसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे विमानतळापासून हॉटेलपर्यंत पाकिस्तान संघाला मोठा पाठिंबा मिळाला.

>पीसीबी अध्यक्ष झका अश्रफ यांनी केली टीका

पाकिस्तानचा संघ भारतात पोहोचल्यापासून अशी काही वक्तव्ये आली आहेत ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढू शकतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी संघाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टबाबत बोलताना भारताला शत्रू देश संबोधले आणि यावरून त्यांच्यावर टीकाही झाली.