ENG vs PAK (Photo Credit - X)

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 2nd Test 2024 Day 3 Scorecard: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 15 ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतान क्रिकेट स्टेडियमवर(Multan Cricket Stadium) खेळला जात आहे. पाकिस्तानची (Pakistan) कमान शान मसूदच्या खांद्यावर आहे. तर इंग्लंडचे (England) नेतृत्व बेन स्टोक्स करत आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात 11 षटकांत दोन गडी गमावून 36 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ विजयापासून अवघ्या 261 धावा दूर आहे. तर पाकिस्तानला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आठ विकेट्सची गरज आहे.

इंग्लंडची खडतर सुरुवात

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 11 धावांवर संघाचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर ओली पोप आणि जो रूट यांनी मिळून डाव सांभाळला. ऑली पोप नाबाद 21 आणि जो रूट नाबाद 12 धावांसह खेळत आहेत. पाकिस्तानकडून साजिद खान आणि नोमान अली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतले. (हे देखील वाचा: Pakistan vs England 2nd Test 2024 Day 4 Preview: चौथ्या दिवशी इंग्लंडचे फलंदाज गाजवणार मैदान की पाकिस्तानी गोलंदाज करणार कहर? मिनी बॅटल, खेळपट्टी, हवामान आणि स्ट्रीमिंगसह सर्व तपशील जाणून घ्या)

कधी अन् कुठे पाहणार सामना?

आम्ही तुम्हाला सांगतो की, सामन्याला सकाळी 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण होणार नाही. तथापि, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाचा आनंद घेता येईल.

दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर.

पाकिस्तान : सईम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान अली आगा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद.