PAK Team (Photo Credit - X)

Pakistan Natonal Cricket Team vs West Indies Cricket Team: पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केला आहे. दोन्ही संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतून बाहेर पडले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला 2-0 असा पराभव पत्करावा लागला. या कारणास्तव, वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात 7 बदल करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान सॅम अयुबला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याला या मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा अशी पीसीबीची इच्छा आहे.  खराब फॉर्ममुळे संघर्ष करणाऱ्या अब्दुल्ला शफीकलाही संघात संधी मिळालेली नाही.

8 खेळाडूंनाच संघात कायम ठेवण्यात आले

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघातील फक्त 8 खेळाडूंनाच संघात कायम ठेवण्यात आले आहे. त्यात शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), बाबर आझम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मोहम्मद रिजवान, नोमान अली आणि सलमान अली आगा यांची नावे आहेत. (हे देखील वाचा: Tamim Iqbal Retirement: बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफी आधी तमीम इक्बालने केली निवृत्तीची घोषणा)

इमाम उल हकचे पुनरागमन

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत फिरकीची जबाबदारी साजिद खान आणि अबरार अहमद यांच्यावर असेल. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांनी चांगली कामगिरी केली होती. सलामीवीर फलंदाज इमाल उल हकचे पुनरागमन झाले आहे. त्याने 2023 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला. त्याने 24 कसोटी सामन्यांमध्ये 1568 धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघ:

शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, काशिफ अली, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक/फलंदाज), नोमान अली, रोहेल नझीर (यष्टीरक्षक/फलंदाज),