Fact Check: पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद इरफान याच्या मृत्यूबद्दल सोशल मीडियावर अफवा, गोलंदाजाने ट्विटकरून सांगितले सत्य
पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद इरफान (Photo Credit: Getty)

सोशल मीडियावर त्याच्या मृत्यूची खोटी बातमी पसरली असल्याची पाकिस्तानचा (Pakistan) वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने (Mohammad Irafn) पुष्टी केली.  रविवारी इरफानचा एका कार अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त ट्विटरवरुन व्हायरल झाले. यानंतर पाकिस्तानी गोलंदाजाने स्वत: ट्विटरवरून आपल्या सुरक्षेची पुष्टी केली. तो ठीक आहे आणि सोशल मीडियावर त्याच्या मृत्यूची अफवाह पसरल्याचे इरफानने पुष्टी केली. अफवाहनां ‘बनावट’ आणि ‘निराधार’ संबोधून इरफानने सांगितले की त्याचा कोणताही अपघात झाला नाही. इरफानने आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना त्रास झाल्यामुळे अशी बातमी पसरवू नये म्हणून उद्युक्त केले. इरफान याने ट्विट केले की, “काही सोशल मीडियावर माझ्या अपघातात मृत्यू झाल्याची निराधार बनावट बातमी पसरवली जात आहे. यामुळे माझे कुटुंब आणि मित्र शब्दाच्या पलीकडे अस्वस्थ झाले आहेत आणि मला याविषयी सतत फोन येत आहेत. कृपया अशा गोष्टींपासून दूर रहा. कोणताही अपघात झाला नव्हता आणि आम्ही बरे आहोत,” असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं. (पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने रस्त्यावर केला डान्स, व्हायरल व्हिडिओ पाहून होईल हसू अनावर)

असे खोटे वृत्त रविवारी, 21 जून रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Pakistan Cricket Board) एका ट्विटनंतर समोर आले. पीसीबीने (PCB) रविवारी पोटातील संक्रमणामुळे बधिर क्रिकेटपटू मोहम्मद इरफानचे निधन झाल्याचे सांगितले होते. त्याने पाकिस्तानकडून 12 सामने खेळले. या ट्विटनंतर गैरसमज झाल्याचं म्हटलं जात आहे. पाहा इरफानचे ट्विट:

पाकिस्तान बोर्डाचे ट्विट:

दुसरीकडे, 2010 इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 38 वर्षीय इरफानने 4 कसोटी, 60 वनडे आणि 22 टी-20 सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले असून त्याने अनुक्रमे 10, 83 आणि 16 गडी बाद केले आहेत. इरफानने टी -20 नावाने एक अनोखा विक्रम नोंदविला आहे. इरफानने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) इतकी चांगली गोलंदाजी केली की कोणताही फलंदाज त्याच्याविरूद्ध धावा करू शकला नाही. चार ओव्हरमध्ये इरफानने फक्त एक धाव दिली, तीही शेवटच्या बॉलवर. त्याआधी त्याचे सर्व बॉल डॉट होते आणि या दरम्यान इरफानने 3 ओव्हर गोलंदाजी केली आणि 2 गडी बाद केले.