India National Under-19 Cricket Team vs Pakistan National Under-19 Cricket Team Match Scorecard: भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत पाकिस्तानला 50 षटकांत 281/7 धावांवर रोखले. एके काळी 160 धावांवर पाकिस्तानने एकही विकेट गमावली नव्हती. भारताकडून समर्थ नागराजने सर्वाधिक 3 बळी घेतले. पाकिस्तानकडून शाहजेब खानने 5 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 150 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना अंडर-19 आशिया कपमध्ये खेळला जात आहे. (हे देखील वाचा: IND vs PAK, ACC U19 Asia Cup 2024 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपण मोफत डिशवर उपलब्ध असेल का? येथे संपूर्ण तपशील जाणून घ्या)
सुरुवातीपासून पाकिस्तानची चांगली सुरुवात
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला पाकिस्तानची फलंदाजी बऱ्यापैकी यशस्वी दिसली, पण हळूहळू भारतीय गोलंदाजांनी आपली पकड घट्ट करत संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. एके काळी पाकिस्तानने 160 धावांवर एकही विकेट गमावली नव्हती. इथून पाकिस्तान संघ 300 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते, पण तसे होऊ शकले नाही.
Shahzaib Khan led the charge with a magnificent century, building on a solid opening stand that set the tone for Pakistan U19’s total of 281 runs. The stage is set for an intense second half—can India U19 match the firepower? 💥#ACC #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/Zo9Fht5qFQ
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) November 30, 2024
येथे वाचा संपूर्ण स्कोरकार्ड
पाकिस्तानकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या उस्मान खान आणि शाहजेब खान यांनी पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी 31 व्या षटकात संपली जेव्हा उस्मान खान 6 चौकारांच्या मदतीने 60 धावा (94 चेंडू) करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर 33व्या षटकात हारून अर्शद केवळ 03 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर संघाला दुसरा धक्का बसला.
शाहजेब अहमदची 159 धावांची शानदार खेळी
यानंतर 241 धावांवर संघाने तिसरा आणि चौथा विकेट गमावला. प्रथम मोहम्मद रियाजुल्ला आणि नंतर फरहान युसूफ पॅव्हेलियनमध्ये परतले. रियाझुल्लाहने 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 27 धावा केल्या, तर फरहान गोल्डन डकचा बळी ठरला. त्यानंतर त्यांनी 253 धावांवर फहम उल हकची पाचवी विकेट गमावली, ज्याने केवळ 04 धावा केल्या. यानंतर, अखेरीस संघाने 274 धावांवर सहावा आणि सातवा विकेट गमावला. प्रथम कर्णधार साद बेग 04 धावा करून बाद झाला आणि त्यानंतर शाहजेब अहमदची 159 धावांची शानदार खेळी संपुष्टात आली.