PAK U19 Team (Photo Credit - X)

India National Under-19 Cricket Team vs Pakistan National Under-19 Cricket Team 3rd Match ACC U19 Asia Cup 2024 Scorecard: आशिया कप (ACC U19 Asia Cup) 2024 चा तिसरा वनडे सामना आज म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तान संघाने टीम इंडियाचा 44 धावांनी पराभव केला आहे. यासोबतच या स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. तत्पूर्वी, स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करत 160 धावा केल्या.

शाहजेब खानची 159 धावांची शानदार शतकी खेळी

पाकिस्तान संघाने 50 षटकात 7 गडी गमावून 281 धावा केल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर शाहजेब खानने 159 धावांची शानदार शतकी खेळी खेळली. या खेळीदरम्यान शाहजेब खानने 147 चेंडूत 5 चौकार आणि 10 षटकार ठोकले. शाहजेब खानशिवाय उस्मान खानने 60 धावा केल्या. आयुष म्हात्रेने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियासाठी समर्थ नागराजने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. समर्थ नागराजशिवाय आयुष म्हात्रेने दोन गडी बाद केले. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 50 षटकात 282 धावा करायच्या होत्या.

हे देखील वाचा: South Africa Beat Sri Lanka, 1st Test Match Scorecard: दक्षिण आफ्रिकेकडून लंका'दहन', पहिल्या कसोटीत 233 धावांनी केला पराभव; मार्को जॉन्सन ठरला सामनावीर

टीम इंडियाची वाईट सुरुवात

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवातही निराशाजनक झाली आणि अवघ्या 51 धावांवर संघाचे तीन प्रमुख फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. या सामन्यात टीम इंडिया 47.1 षटकात केवळ 237 धावांवरच मर्यादित राहिली. टीम इंडियासाठी निखिल कुमारने 67 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान निखिल कुमारने 77 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. या सामन्यात निखिल कुमार व्यतिरिक्त मोहम्मद अननने 30 धावा केल्या. अब्दुल सुभानने पाकिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तानकडून अली रझाने सर्वाधिक तीन बळी घेतले. अली रझाशिवाय फहम-उल-हक आणि अब्दुल सुभानने प्रत्येकी दोन गडी बाद केले.