Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team, 2nd ODI Match Scorecard:   ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ 2024 च्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series 2024)  दुसरा सामना आज म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना ॲडलेडच्या (Adelaide)  ॲडलेड ओव्हलवर (Adelaide Oval)  खेळला गेला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा  (Australia) 9 गडी राखून पराभव केला. यासह पाकिस्तानने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत पॅट कमिन्स (Pat Cummins)  ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तानची (Pakistan)  कमान मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan)  हातात आहे.  (हेही वाचा -  Australia vs Pakistan 2nd ODI: रिझवानमुळे पाकिस्तानचे झाले नुकसान, ॲडम झाम्पाच्या सल्ल्याने DRS घेणे पडले महागात )

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि दोन फलंदाज अवघ्या 41 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. ऑस्ट्रेलियन संघ 35 षटकात अवघ्या 163 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 35 धावांची खेळी खेळली. स्टीव्हन स्मिथशिवाय मॅथ्यू शॉर्टने 19 धावा केल्या.

AUS vs PAK सामन्याचे संपूर्ण हायलाइट्स येथे पहा:

शाहीन आफ्रिदीने पाकिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक 5 बळी घेतले. हरिस रौफशिवाय शाहीन आफ्रिदीने तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान संघाला 50 षटकात 164 धावा करायच्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 137 धावांची मजल मारली. पाकिस्तान संघाने अवघ्या 26.3 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून सलामीवीर सैम अयुबने 82 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली.

या खेळीदरम्यान सैम अयुबने 71 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकार ठोकले. सैम अयुब व्यतिरिक्त अब्दुल्ला शफीकने 64 नाबाद धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. ॲडम झाम्पाने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पाने सर्वाधिक एक विकेट घेतली. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.