PAK vs SL: पाकिस्तानमध्ये श्रीलंकन खेळाडूंना अशी दिली जात आहे सुरक्षा, गौतम गंभीर याने शेअर केला हास्यास्पद व्हिडिओ
(Photo Credit: Getty/Instagram)

टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि भाजप सांसद गौतम गंभीर (Gautam Gambhir) आपल्या बेधडक विधानांसाठी प्रसिद्ध आहे. गौतमने अनेकदा पाकिस्तान (Pakistan) देशातील खेळाडू, राजकीय नेते आणि त्यांच्या क्रिकेट संघावर भाष्य केले आहेत. आणि आता पुन्हा एकदा त्याने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. गंभीरने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. गंभीरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये श्रीलंका (Sri Lanka) संघाच्या खेळाडूंना देण्यात आलेल्या सुरक्षेची स्थिती दर्शविली आहे. श्रीलंका संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. 2009 मध्ये कराचीच्या गद्दाफी स्टेडियमजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका संघ किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा पहिल्या पाकिस्तान दौरा आहे. याआधी श्रीलंकेच्या बहुतांश खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेतली होती. (PAK vs SL 2nd ODI: बाबर आझम याने विराट कोहली, जावेद मियांदाद यांना टाकले मागे; 11 वे शतक झळकावत नोंदविला विशेष विक्रम)

गंभीरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पहायला मिळते की कशाप्रकारे कर्फ्यू लावून पाकिस्तानात मॅच खेळवली जात आहे. व्हिडिओ शेअर करताना गंभीरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''इतके काश्मीर केले की कराचीला विसरून गेले.' हा व्हिडिओ श्रीलंकेची टीम रस्त्यावरून जात असताना गाडीत बसलेल्या दोन लोकांनी बनवला आहे. व्हिडिओची सुरुवात 'धूम' च्या बाईकने होते जी सुरक्षेमध्ये अग्रेसर होती. श्रीलंका संघाला कशी सुरक्षा दिली जात आहे हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. व्हिडिओमध्ये, सुरक्षेमध्ये दोन डझनहून अधिक वाहने रस्त्यावर दिसत आहे. याशिवाय सुरक्षेसह रुग्णवाहिकादेखील चालविली जात आहे, यावर व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांनी मजा करत म्हटले आहे की, इतकी कडक सुरक्षा असूनही जर काही अडचण आल्यास एम्बुलन्सचीही व्यवस्था केली आहे.' ते म्हणाले की, एवढी कडक सुरक्षा असूनही कोणत्याही समस्येचा धोका आहेच.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautam Gambhir (@gautamgambhir55) on

पाकिस्तानसाठी सध्या काहीही चांगले चालले नाही. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे एकही चेंडू फेकल्याशिवाय शुक्रवारी रद्द करण्यात आला. पाकिस्तानमध्ये श्रीलंका क्रिकेट संघाच्या अशा सुरक्षेमागील कारण म्हणजे मार्च 2009 च्या दौऱ्यादरम्यान श्रीलंका संघावर लाहोर (Lahore) मध्ये हल्ला झाला होता, त्यात सहा खेळाडू जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर बर्‍याच आंतरराष्ट्रीय संघांनी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला होता. श्रीलंकानंतर आता काही वर्षांनी ऑस्ट्रेलिया (Australia) संघ पाकिस्तानचा दौरा करण्याची शक्यता आहे.