पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू झाला. दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. सामन्याच्या पहिल्याच षटकात तस्किन अहमदने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. तस्किनने अब्दुल्ला शफीकला क्लीन बोल्ड केले. मात्र, यानंतर कर्णधार शान मसूद आणि सॅम अयुब यांनी धडाकेबाज फलंदाजी करत दोन्ही फलंदाजांनी मोठी भागीदारी केली. मात्र या दोघांच्या बाद होताच कोणताच पाकिस्तानी खेळाडू चांगली खेळी करू शकला नाही.  (हेही वाचा  - PAK vs BAN 2nd Test Live Score: पाकिस्तानची धावसंख्या 100 धावांच्या पार, सॅम अयुबने ठोकले अर्धशतक)

पाहा पोस्ट -

पाकिस्तानकडून कर्णधार शान मसूद (57) आणि सॅम अयुब (58) यांनी दोघांनी अर्घशतके झळकावले आणि बाद झाले. पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम हा पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. बाबर आझमने 77 चेंडूत 31 धावाकरून बाद झाला. शाकिब उल हसनने त्याला पायचीत केले.

आजच्या सामन्यात तस्कीनने आतापर्यंत दोन विकेट घेतले असून मेहंदी हसन मिराजने दोन विकेट घेतल्या आहेत.