पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू झाला. दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. सामन्याच्या पहिल्याच षटकात तस्किन अहमदने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. तस्किनने अब्दुल्ला शफीकला क्लीन बोल्ड केले. मात्र, यानंतर कर्णधार शान मसूद आणि सॅम अयुब यांनी धडाकेबाज फलंदाजी करत दोन्ही फलंदाजांनी मोठी भागीदारी केली. सध्या लंच ब्रेकपर्यंत पाकिस्तानने 25 षटकांत 1 गडी गमावून 99 धावा केल्या आहेत. तर बांगलादेश तिसऱ्या विकेटच्या शोधात आहे. वृत्त लिहेपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या 29 षटकांत 115/2 अशी आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)