On This Day in 2019: टीम इंडियासाठी (Team India) 2018-19 ऑस्ट्रेलिया (Australia) दौरा अधिकच खास सिद्ध झाला होता. आजच्या दिवशी 2018-19 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने (कांगारू संघाचा 2-1 ने पराभव करत ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. कांगारू संघाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत धूळ चारणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला होता. 6 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान भारत (India)-ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली ज्यातील पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने तर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने मोठा विजय मिळवाल होता. मात्र, सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) आजच्या दिवशी मालिकेच्या अंतिम दिवसाचा खेळ रंगला होता. चेतेश्वर पुजारा संघाच्या विजयाचा नायक ठरला. भारताने पहिला डाव 622-7 च्या धावसंख्येवर घोषित केला ज्याच्या प्रत्युत्तरात कांगारू संघ 300 धावाच करू शकला. (IND vs AUS 3rd Test Day 1: सिडनी टेस्टच्या पहिल्याच दिवशी पावसाने आणला व्यत्यय, ऑस्ट्रेलियाचा स्कोर 21/1)
पुजाराने शानदार 193 धावांची केली केली तर रिषभ पंतने 159 धावा फडकावल्या. सलामी फलंदाज मयंक अग्रवालने 77 तर रवींद्र जडेजाने 81 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियासाठी मार्कस हॅरिसने पहिल्या डावात सर्वाधिक 79 धावा केल्या होत्या तर अन्य फलंदाज चाळीशीचा आकडाही पार करू शकले नाही. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, या दरम्यान डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आल्याने ते संघाचा भाग नव्हते. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात 322 धावांची आघाडी घेतल्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीने यजमान संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला आणि पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात यजमान संघ दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 6 धावांपर्यंतच मजल मारू शकला. अशाप्रकारे, विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मालिकेत विजयाची नोंद केली.
दरम्यान, टीम इंडियाच्या 2020-21 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील तिसरी टेस्ट मॅच सिडनीमध्ये खेळली जात आहे. या मैदानावर टीम इंडियाने अखेर 42 वर्षांपूर्वी 1978 मध्ये कसोटी विजय मिळवला होता, त्यानंतर संघाला 6 पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थतीत यंदा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात संघाला या मैदानावर पहिला विजय नोंदवून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्याची सुवर्ण संधी आहे.