वर्ल्ड चॅम्पियन बाणाने काय असते ते 1983 मध्ये पहिल्यांदा भारतीय क्रिकेट चाहत्यांसमोर उघड झाले. 25 जून रोजी कपिल देवच्या (Kapil Dev) नेतृत्वात टीम इंडियाने (Indian Team) वेस्ट इंडिजला पराभूत करून विश्वचषक (World Cup) जिंकला. पण तुम्हाला माहिती आहे काय की विश्वविजेतेपदाची पायाभरणी 18 जून 1983 रोजी केली गेली होती आणि ही पाया खुद्द कर्णधार कपिल यांनी ठेवली होती. वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम चारची फेरी गाठण्यासाठी भारताला झिम्बाब्वेला (Zimbabwe) पराभूत करण्याची गरज होती. आणि कपिल यांनी आजच्या दिवशी म्हणजेच 18 जून 1983 रोजी 175 धावांची जादुई खेळी करत सामना जिंकला. नाणेफेक जिंकून कपिल यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुनील गावस्कर, के.आर. श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील स्वस्त बाद झाले. टीम इंडियाची स्थिती खराब असताना आणि फलंदाजीसाठी कपिल यशपाल शर्मा यांना पाठिंबा देण्यासाठी आले. (On This Day in 1975: आजच्या दिवशी भारताने नोंदवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला विजय; सुनील गावस्कर आणि बिशन सिंह ठरले नायक)
भारताने 17 धावांवर 5 विकेट गमावले आणि नंतर खेळपट्टीवर कपिल आणि रॉजर बिन्नी उपस्थित होते. यानंतर कपिलने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना सेलिब्रेशन करण्यासाठी फारशी संधी दिली नाही आणि 175 धावा फटकावल्या. शिवाय, कपिल यांचे शतक खास होते. वर्ल्ड कप सामन्यात भारतीय फलंदाजाने केलेले हे पहिले शतक होते. 138 चेंडूत त्यांनी 16 चौकार आणि 6 षटकार ठोकले. बिन्नी, मदन लाल आणि सय्यद किरमानी यांच्या छोट्या भागीदारीच्या जोरावर कपिलने स्कोर 266 धावांवर पोहचवला. ते नाबाद परतले आणि एकावेळी स्कोअर 100 धावांवर पोहोचणार नाही अशी शंका असताना त्यांनी अखेरीस धावसंख्या 250 च्या पार नेली. आणि प्रत्युत्तरात झिम्बाब्वे टीम 235 धावांवर ऑलआऊट झाली.
🌟 Runs: 175* (138)
🌟 Fours: 16
🌟 Sixes: 6#OnThisDay against Zimbabwe in 1983, Kapil Dev smashed the first century in ODIs for 🇮🇳 in the men's @cricketworldcup 🙌 pic.twitter.com/2r2Mu7l26j
— ICC (@ICC) June 18, 2020
दरम्यान, हा सामना बीबीसीच्या संपामुळे कोणत्याही वाहिनीवर रेकॉर्ड होऊ शकला नाही आणि दुर्दैवाने कपिलचा डाव आपण पाहावयास मिळाला नाही. दुसरीकडे, 2002 मध्ये विस्डेनने पहिल्या दहा फलंदाजीच्या कामगिरीमध्ये कपिलच्या या डावाचा समावेश केला होता, परंतु कोणताही व्हिडिओ उपलब्ध नव्हता.