Virat Kohli ला ब्रँड व्हॅल्यूमध्ये Neeraj Chopra देणार टक्कर, ऑलिम्पिक ‘गोल्डन बॉय’ 10 पटीने महागला; पाहा कोणाची आहे किती Brand Value
विराट कोहली व नीरज चोप्रा (Photo Credit: PTI)

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) गेल्या महिन्यात ऑलिम्पिकमध्ये केवळ दुसरे भारतीय वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू ठरला. टोकियो ऑलिम्पिकला एक महिना उलटला आहे. खेळांच्या या भव्य स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी आपली चमक दाखवली आणि ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सर्वाधिक पदके जिंकण्याचा करिश्मा केला. भारतीय खेळाडूंनी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण सात पदके जिंकली. पदक जिंकल्यानंतर घरी परतलेल्या या खेळाडूंवर पैशाचा वर्षावही करण्यात आला. याशिवाय, डझनभर ब्रँड पदक विजेत्यांकडे आकर्षित झाले आहेत. ज्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय पदक (India Olympic Medal Tally) विजेत्यांना आर्थिक आघाडीवरही फायदा झाला आहे. नीरजच्या ब्रँड एंडोर्समेंट फीमध्ये 1000 टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे आणि फक्त भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्यापुढे एकमेव खेळाडू आहे.

नीरज चोप्राचे PR तसेच भारतीय भाला स्टारचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या JSW च्या मते, भारतीय स्टारचे एंडोर्समेंट शुल्क आता किमान 10 पटीने वाढले आहे. “नीरज चोप्राच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये झालेली वाढ त्याच्या नॉन-क्रिकेट कामगिरीमुळे आहे. या व्यतिरिक्त तो पुढील काही आठवड्यांत लक्झरी ऑटो आणि परिधान ब्रँडसह पाच-सहा करार करण्यास तयार आहे,” JSW च्या एका अधिकाऱ्याने दैनिक भास्करला सांगितले. टोकियो ऑलिम्पिकपूर्वी वार्षिक आधारावर केवळ 15-25 लाख प्रति अनुमोदन घेत असल्याचे बोलले जाणारा नीरज आता नवे करार करण्याच्या चर्चेत आहेत आणि ते देखील 10 पटी अधिक अनुदानाने. तज्ञांच्या मते, भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये, विशेषतः वैयक्तिक कार्यक्रमांनंतर, अनुमोदन मूल्यामध्ये 10 पटीने वाढ होणे अतुलनीय आहे. या तुलनेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या देशातील एकमेव क्रीडापटू आहे जो 1 ते 5 कोटी रुपयांच्या क्षेत्रात फी आकारतो. त्याच्या अनुमोदन शुल्कात वाढ झाल्यामुळे, नीरज देखील कोहलीपेक्षा किंचित कमी असला तरी त्याच ब्रॅकेटमध्ये सामील झाला आहे.

दरम्यान, नीरज चोप्राचे एका वर्षासाठीचे ब्रँड एंडोर्समेंट शुल्क आता दरवर्षी सुमारे 2.5 कोटी रुपये अपेक्षित आहे जे त्याला विराट, एमएस धोनी आणि रोहित शर्मा सारख्या आघाडीच्या भारतीय क्रिकेटपटूंच्या लीगमध्ये ठेवते. कोहली वर्षाला 1 ते 5 कोटी रुपये कमावतो, तर माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी देखील तितकीच कमाई करतो. तसेच रोहित आणि केएल राहुलची फी दरवर्षी 50 लाख ते 1 कोटी रुपयांच्या दरम्यान असते.