NZ vs PAK 2nd T20I: 40 वर्षीय मोहम्मद हाफिजची नाबाद 99 धावांची विक्रमी खेळी व्यर्थ; टिम सेफर्ट-केन विल्यमसनची शतकी भागीदारी पाकिस्तानवर भारी
टिम सेफर्ट आणि केन विल्यमसन, मोहम्मद हफीज (Photo Credit: Twitter/ICC)

NZ vs PAK 2nd T20I: पाकिस्तानचा (Pakistan) अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिजने (Mohammad Hafeez) 2020 मध्ये टी-20 मध्ये आपला शानदार फॉर्म कायम राखला आहे. रविवारी, न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दुसर्‍या टी-20 सामन्यात पाकिस्तानसाठी एकाकी लढत देत नाबाद 99 धावा करत हॅमिल्टन (Hamilton) टी-20 सामन्यात संघाला स्पर्धात्मक धावसंख्या करण्यास महत्वाची भूमिका बजावली. या तुफानी डावामुळे हाफिजने चाळीशीत आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला. न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी संघाला विजय मिळवणे गरजेचे होते मात्र यंदाही त्यांची स्थिती तशीच राहिली. कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) आणि यष्टिरक्षक फलंदाज टिम सिफर्टच्या (Tim Seifert) नाबाद डावाच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानला धूळ चारली आणि 9 विकेटने सामना जिंकून टी-20 मालिकेत विजयी आघाडी घेतली. (Kane Williamson Welcomes Baby Girl: केन विल्यमसनच्या घरी गोंडस मुलीचं आगमन, मुलीला हृदयाशी लावलेला फोटो पोस्ट करून दिली गुड न्यूज (See Photo))

हाफिजने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये बल्गेरियाविरुद्ध माल्टाच्या हेनरिक ग्रिक्केने केलेल्या 91 धावांच्या विक्रमला मागे टाकले. हाफिजला अंतिम ओव्हरमध्ये तिहेरी धावसंख्या गाठता आली आणि त्याचा डाव 5 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 99 धावांवर संपुष्टात आला. हाफिजच्या नाबाद 99 धावांच्या जोरावर पाकिस्तानने पहिले फलंदाजी करून 163 धावसंख्येपर्यंत मजल मारली, पण संघाला विजय मिळवून देण्यास पुरेसे नव्हते. टीमने 16 धावांवर 2 विकेट गमावल्यावर हाफिज मैदानावर आले. एकाबाजूने विकेट पडत असताना अनुभवी अष्टपैलू खेळाडू एकट्याने हा सामना न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांचा सामना केला. हाफिजने 5व्या विकेटसाठी खुशदिल शाहसह 63 धावांची भागीदारी केली ज्याने केवळ 14 धावा केल्या.

दुसरीकडे, पाकिस्तानकडून मिळालेल्या 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या किवी संघाने मार्टिन गप्टिलची एकमेव विकेट गमावून लक्ष्य गाठले. विल्यमसनने किवी संघाकडून 42 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या, ज्यामध्ये 8 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता तर सिफर्टने 63 चेंडूत नाबाद 84 धावा फटकावल्या आणि त्याने 8 चौकार व 3 षटकार लगावले. दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी करत घालून संघाला विजय मिळवून दिला.