डेव्हिड मालन (Photo Credit: Getty)

इंग्लंड (England) संघाच्या न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना आज मॅक्लीन पार्क, नेपियरमध्ये (Napier) खेळला जात आहे. 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडने 2-1 ने आघाडी मिळवली आहे. दोन्ही संघातील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस गमावून पहिले बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि 58 धावांवर 2 विकेट गमावले. पण, नंतर फलंदाजीसाठी आलेल्या डेव्हिड मालन (Dawid Malan) आणि कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) यांनी संघाचा डाव सावरला. दोघांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने निर्धारित षटकात 3 बाद 241 धावांचा मोठा स्कोर केला. यादरम्यान, मालन शेवटपर्यंत नाबाद राहिला, तर मॉर्गनचे शतक हुकले आणि तो 91 धावांवर झेलबाद झाला. मालन शतकी खेळी करत 103 धावांवर नाबाद परतला.

या सामन्यात मालनने शानदार शतक करत इंग्लंडसाठी एका रेकॉर्डची नोंद केली. इंग्लंडकडून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा रेकॉर्ड आता मालनच्या नावावर झाला आहे. मालनने 48 चेंडूत 101 धावा केल्या आणि या रेकॉर्डची नोंद केली. इंग्लंडकडून टी-20 शतक करणारा एलेक्स हेल्स (Alex Hales) याच्यानंतर मालन दुसरा फलंदाज आहे.  हेल्सने श्रीलंकाविरुद्ध 60 चेंडूंमध्ये शतक केले होते. इतकेच नाही तर ईश सोढी (Ish Sodhi) याने टाकलेल्या 17 व्या ओव्हरमध्ये मालनने 28 धावा काढल्या. इतकेच नाही, तर मालन आणि मॉर्गनने इंग्लंडसाठी सर्वाधिक टी-20 भागीदारीचीही नोंद केली. मालन आणि मॉर्गनने 183 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडविरुद्ध आजच्या या मॅचमध्ये मालनने दमदार फलंदाजी केली. आजचा सामना इंग्लंडसाठी महत्वाचा आहे. न्यूझीलंडने यापूर्वीचा सामना जिंकत मालिकेत 5ph सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे, त्यामुळे आजची मॅच जिंकत इंग्लंड मालिकेत 2-2 ने बरोबरी करण्याच्या प्रयत्नात आहे.

डेव्हिड मालन-मॉर्गन भागीदारी

मागील सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी इंग्लंडला 181 धावांचे लक्ष्य दिले होते, पण इंग्लंडला 14 धावांनी पराभव झाला आणि किवी संघाने मालिकेत आघाडी मिळवली. न्यूझीलंडने दिलेल्या 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची स्थिती चांगली होती आणि त्यांनी 15 व्या ओव्हरपर्यंत 2 बाद 139 धावा केल्या. पण, वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसन आणि ब्लेअर टिकनर यांनी इंग्लंडच्या तोंडून विजय खेचला. संपूर्ण इंग्लंड संघ निर्धारित 20 ओव्हरमध्ये 166/7 धावा करू शकला.