PC-X

New Zealand Women National Cricket Team vs Sri Lanka Women National Cricket Team 3rd T20I 2025 Live Streaming: न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा टी20 सामना 18 मार्च रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 2.45 वाजता ड्युनेडिनमधील युनिव्हर्सिटी ओव्हल येथे खेळला जाईल. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचा 7 विकेट्सने पराभव केला. पण दुसऱ्या टी-20 मध्ये न्यूझीलंडच्या महिला संघाने जबरदस्त पुनरागमन केले आणि श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव केला. आता सर्वांचे लक्ष मालिकेतील तिसऱ्या सामन्यावर आहे.

सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?

न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 18 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 2.45 वाजता युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन येथे खेळला जाईल. तर टॉसची वेळ त्यापूर्वी अर्धा तास असेल.

सामना कुठे पहाल?

न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना भारतातील सोनी स्पोर्ट्स टेन नेटवर्क वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, तुम्ही फॅनकोड, सोनी लिव्ह आणि प्राइम व्हिडिओ अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.