PC-X

New Zealand National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd ODI 2025 Scorecard: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (NZ vs PAK) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज म्हणजे 2 एप्रिल रोजी सेडन पार्क, हॅमिल्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 8 विकेट्स गमावून 292 धावा केल्या. न्यूझीलंड संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज मिशेल हेने सर्वाधिक धावा केल्या. मिचेल हेने (Mitchell Hay) 78 चेंडूत 99 धावांची नाबाद खेळी केली. ज्यामध्ये त्याने 8 चौकार आणि 7 षटकार मारले. याशिवाय मोहम्मद अब्बासने 66 चेंडूत 41 धावा केल्या. डॅरिल मिशेलने 18 धावा, निक केलीने 31 धावा आणि हेन्री निकोलसने 22 धावांचे योगदान दिले.

न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सततच्या विकेट्समुळे मोठी धावसंख्या होऊ शकली नाही. त्यानंतर मिशेल हेने मजबूत खेळी करत संघाला सावरले. दुसरीकडे, पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियर आणि सुफियान मुकीम यांनी शानदार गोलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या. तर फहीम अश्रफ, आकिब जावेद, हरिस रौफ यांनी 1-1 विकेट घेतल्या.

सध्या, मालिका बरोबरीत आणण्यासाठी पाकिस्तानला 293 धावा करायच्या आहेत. यजमान संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत किवी संघाच्या गोलंदाजांना हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.