India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 113 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याआधी, तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघ दुसऱ्या डावात 255 धावांवर ऑलआउट झाला. यासह पाहुण्या संघाने भारतासमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघ 60.2 षटकात 245 धावांवर गारद झाला. यासह न्यूझीलंड संघाने नवा इतिहास रचला आहे. न्यूझीलंड संघाने प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली आहे.
2ND Test. New Zealand Won by 113 Run(s) https://t.co/3vf9Bwzgcd #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 26, 2024
पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या सात विकेट
त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 259 केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी चांगली कामगिरी केली. कॉनवेने 141 चेंडूंचा सामना करत 76 धावा केल्या. रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले. मिचेल सँटनर 33 धावा करून बाद झाला. टॉम लॅथम 15 धावा करून बाहेर पडला. भारताकडून सुंदरने 7 आणि अश्विनने 3 विकेट घेतल्या. (हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal New Record: यशस्वी जैस्वालने घरच्या मैदानावर रचला इतिहास, गुंडप्पा विश्वनाथ- सुनील गावस्कर यांचा विक्रम काढला मोडीत)
भारतीय संघ पहिल्या डावात 156 धावांवर गारद
प्रत्युत्तरात, भारतीय संघ पहिल्या डावात 156 धावांवर गारद झाला. दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला काय खास सुरुवात करता आली नाही. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी प्रत्येकी 30-30 धाव केल्या. तर रवींद्र जडेजाने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 1 धावावर बाद झाला त्यानंतर भारतीय फलंदाजांनी विकेट फेकल्या. दुसरीकडे न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर सर्वाधिक सात विकेट घेतल्या.
कर्णधार टॉम लॅथमने 86 धावांची शानदार खेळी
यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेला न्यूझीलंडचा संघ 69.4 षटकांत 255 धावांत गारद झाला. न्यूझीलंड संघाने 358 धावांची मोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाकडून कर्णधार टॉम लॅथमने 86 धावांची शानदार खेळी केली. टॉम ब्लंडेलने नाबाद 41 आणि ग्लेन फिलिप्सने नाबाद 48 धावा केल्या. टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. अश्विनने 2 तर जडेजाने 3 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी 359 धावांचं लक्ष्य होतं.
यशस्वी जैस्वालची सर्वाधिक 77 धावांची खेळी
दुसऱ्या डावात 359 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण भारतीय संघ 60.2 षटकात केवळ 245 धावा करू शकला नाही. टीम इंडियासाठी सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 77 धावांची खेळी खेळली. यशस्वी जैस्वालशिवाय रवींद्र जडेजाने 42 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक सहा बळी घेतले. मिचेल सँटनरशिवाय एजाज पटेलने दोन बळी घेतले. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सकाळी 9.30 वाजता होणार आहे.