संजय मांजरेकर आणि सौरव गांगुली (Photo Credit: Instagram)

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध भाष्यकार संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) नेहमीच आपल्या वादग्रस्त टिप्पण्यांमुळे चर्चेत असतात. गेल्या वर्षी मांजरेकर यांनी अनेकदा या वादाला आमंत्रण दिले. असे असूनही ते बीसीसीआयशी संबंधित होते. पण आता बीसीसीआयने (BCCI) कॉमेटरी पॅनेलमधून मांजरेकर यांची हकालपट्टी केल्याचे वृत्त समोर आले आहे. कोरोनाव्हायरस (Coronavirus) सर्व देशभर पसरला असताना आणि खेळावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जाणून घेण्यात जग व्यस्त असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही मांजरेकरांबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील नुकत्याच रद्द झालेल्या वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने मांजरेकर यांना पॅनेलमधून काढून टाकले. मांजरेकरांचे हाल येथे संपत नाहीत, कारण मंडळ त्यांना आयपीएलच्या कमेन्टरी पॅनेलमध्येही समाविष्ट न करण्याचा विचार करत आहे. ही बातमी पसरल्यानंतर अनेक यूजर्सनी या निर्णयाबद्दल सौरव गांगुलीचे कौतुक केले. (BCCI कडून संजय मांजरेकर यांची कॉमेंट्री पॅनेलमधून हकालपट्टी, आयपीएल 2020 मध्ये समावेशावर संशय, सूत्रांची माहिती)

तथापि, मांजरेकर यांना वगळण्याची बातमी आश्चर्यचकित होण्यासारखी नाही कारण गेल्या वर्षी त्यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे काही मोठ्या वादाला जन्म दिला होता. पहिल्यांदा जेव्हा त्याने विश्वचषकदरम्यान रवींद्र जडेजाला बिट्स आणि पीस क्रिकेटर म्हटले. नंतर, त्यांनी सह भाष्यकार हर्षा भोगले यांच्या क्रेडेन्शियल्सवर ऑन एअर प्रश्न उपस्थित केले होते. मांजरेकर यांच्या हकालपट्टीवर यूजर्सच्या प्रतिक्रिया पाहा:

दादा ऑन फायर

दादाबरोबर पंगा घ्यायचा नाही

दरम्यान जडेजा

हाहाहाहा

मांजरेकरची कारकीर्द

आपण पात्र आहात

बीसीसीआय किंवा मांजरेकर यांनी स्वतः नुकत्याच झालेल्या घटनेविषयी अद्याप कोणतेही अप्ष्टीकरण दिले नसले तरी या वृत्तपत्राने बीसीसीआयच्या एका सूत्रानुसार या माजी क्रिकेटपटूला पॅनेलमधून वगळले असल्याचे म्हणटले आहे. दुसरीकडे, भाष्यकारासह असे करण्याची ही पहिली वेळ नाही. 2016 मध्ये भोगले यांना कोणतेही कारण न देता पॅनेलमधून काढून टाकण्यात आले होते. तथापि, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भोगले बीसीसीआयच्या कमेंटरी पॅनेलमध्ये परतले होते.