Australia Men's National Cricket Team vs Indian National Cricket Team: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात गाबा येथे खेळला जात आहे. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा केली आहे. 100 धावापूर्वीच अर्धी टीम इंडिया पॅव्हेलियनमध्ये परतली होती. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा गाबा टेस्टमध्ये 6 नंबरवर बॅटिंग करताना दिसला. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण नंतर तीच जुनी चूक करत त्याने त्याची विकेट गमावली. ॲडलेड कसोटीत रोहित ज्या प्रकारे बाद झाला, तसंच काहीसं गाबामध्येही पाहायला मिळालं. यानंतर रोहितवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रोहितचा फ्लॉप शो सुरूच
ॲडलेड कसोटीनंतर रोहित शर्माही गाब्बामध्ये 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला, पण रोहितला ना सलामीला चांगली फलंदाजी करता आली ना मधल्या फळीत. चौथ्या दिवशी रोहित अवघ्या 10 धावा करून बाद झाला. पुन्हा एकदा पॅट कमिन्सने रोहितची विकेट घेतली. आता चाहते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. काही यूजर्स आता रोहित शर्माच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीबद्दलही बोलत आहेत.
Pat Cummins is that fired up after getting Rohit Sharma!#AUSvIND | #OhWhatAFeeling | @Toyota_Aus pic.twitter.com/dZImJlva2I
— cricket.com.au (@cricketcomau) December 17, 2024
Like this Post if you think Rohit Sharma should retire. pic.twitter.com/HL74dOyPf9
— Krishna. (@KrishVK_18) December 17, 2024
टीम इंडियाला जिंकणे अवघड
आता गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाची पकड खूपच मजबूत असल्याचे दिसून येत आहे. गब्बामध्ये टीम इंडियाला पराभवाचा धोका आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत आणि रोहित शर्मा हे गाबा कसोटीच्या पहिल्या डावात फ्लॉप ठरले, त्यामुळे टीम इंडियाचा तणाव वाढला आहे. आता टीम इंडियासाठी हा सामना जिंकणे खूप कठीण मानले जात आहे, तर दुसरीकडे रोहित आणि कंपनीला गाब्बा कसोटी ड्रॉ करायची आहे.