तर संयुक्त अरब अमिरातीने आतापर्यंत काही विशेष कामगिरी केलेली नाही. संयुक्त अरब अमिरातीने आतापर्यंत ४ सामने खेळले असून चारही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यूएई संघ अंतिम टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे.
दरम्यान, यूएईचा कर्णधार महंमद वसीमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या नामिबियाच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. नामिबियाचा संपूर्ण संघ निर्धारित 50 षटकात 313 धावा करत सर्वबाद झाला.
पाहा पोस्ट -
#RichelieuEagles 🏏313 after 50 overs
UAE target 🎯314
Watch the game live on ICC Tv📺
Follow the livescore on 👇 https://t.co/cGhgdTrqeI#CWCL2 pic.twitter.com/gHHZmdFVIE
— Official Cricket Namibia (@CricketNamibia1) September 20, 2024
नामिबियासाठी सलामीवीर मायकेल व्हॅन लिंगेनने सर्वाधिक 107 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मायकेल व्हॅन लिंगेनने चार षटकार आणि नऊ चौकार लगावले. मायकेल व्हॅन लिंगेनशिवाय जेपी कोटझेने 64 धावा केल्या.
मुहम्मद जवादुल्लाहने यूएई संघाला पहिले यश मिळवून दिले. यूएईकडून अली नसीरने सर्वाधिक तीन बळी घेतले. अली नसीरशिवाय मुहम्मद जवादुल्ला, जुनैद सिद्दीकी, बासिल हमीद, विष्णू सुकुमारन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. हा सामना जिंकण्यासाठी UAE संघाला 50 षटकात 314 धावा करायच्या आहेत.