MI W (Photo Credit -X)

RCB W vs MI W, WPL 2025 7th Match: महिला प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील सातवा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आणि मुंबई इंडियन्स महिला यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. त्याआधी, मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत आरसीबी संघाने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 168 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेली मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने 50 धावा केल्या आणि दमदार अर्धशतक झळकावले. दरम्यान, अमनजोत कौरने 34 धावांची नाबाद खेळी करत मुंबईचा विजय निश्चित केला.

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 167 धावा केल्या. खराब सुरुवात असूनही बंगळुरूला मोठी धावसंख्या गाठण्यात यश आले. आरसीबीसाठी सर्वात मोठी खेळी अॅलिस पेरीने खेळली, तिने 43 चेंडूत 81 धावा केल्या. या खेळीदरम्यान तिने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. पेरी आता WPL इतिहासात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनण्यापासून फक्त 32 धावा दूर आहे. मुंबईविरुद्धच्या तिच्या 81 धावांच्या खेळीदरम्यान, तिने तिच्या WPL कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले.

आरसीबीने आतापर्यंत WPL 2025 मध्ये त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत. प्रथम त्यांनी गुजरात जायंट्सचा 6 विकेट्सने आणि नंतर दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट्सने पराभव केला. पण मुंबई इंडियन्सविरुद्धच्या 4 विकेटनी पराभवामुळे त्यांना विजयाची हॅटट्रिक गाठण्यापासून रोखले गेले आहे. हरमनप्रीतच्या अर्धशतकाने अॅलिस पेरीच्या 81 धावांच्या खेळीला मागे टाकले.

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अमनजोत कौर आली तेव्हा सामना मुंबईसाठी वळला. 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 82 धावांवर 4 विकेट गमावल्या. त्यानंतर, हरमनप्रीत आणि अमनजोत यांच्यात 62 धावांची अतिशय महत्त्वाची भागीदारी झाली.